24 September 2020

News Flash

अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात

अनुष्का शर्माच्याच हस्ते तिच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले

अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. अनुष्का शर्माच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. पार्टीवेअर गाऊन आणि सेल्फी घेतानाच्या पोजमध्ये हा पुतळा आहे. या पुतळ्याजवळ जेव्हा अनुष्का शर्मा उभी राहिली तेव्हा पुतळा कोण आणि खरी अनुष्का कोण हे क्षणभर लक्षात येत नव्हते इतका हुबेहुब पुतळा साकारण्यात आला आहे.

अनुष्का शर्माची चर्चा झिरो या सिनेमामुळे होते आहे. या सिनेमात शाहरुख खान अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच तिचा सुई धागा हा सिनेमाही यशस्वी ठरला. काही दिवसांपूर्वी वॅक्स स्टॅच्यूसाठी अनुष्का शर्माने माप दिले होते. अनुष्काचा हा पुतळा सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात ठेवण्यात आहे. स्वतःचा पुतळा पाहून अनुष्का शर्मा चांगलीच खुश दिसली. सेल्फी पोजच्या या पुतळ्यासह अनुष्कानेही फोटो काढला.

मादाम तुसाँ या संग्रहालयात आत्तापर्यंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरुख खान, हृतिक रोशन अशा अनेक सेलिब्रिटींचे पुतळे ठेवण्यात आले आहेत आता या पुतळ्यांमध्ये अनुष्का शर्माच्या पुतळ्याचीही भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 7:20 pm

Web Title: anushka sharma statue of wax inaugurated at singapore madame tussauds museum
Next Stories
1 Video: ‘काफीराना सा है, इश्क है या क्या है’; सारा- सुशांतची रोमॅण्टिक केमिस्ट्री
2 आदेश श्रीवास्तव यांच्या मुलाचं संगीत क्षेत्रात पदार्पण
3 Photos : दीप- वीरच्या लग्नातील काही खास क्षणचित्रे
Just Now!
X