अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ हे अवघे दोनच चित्रपट केले. या दोन चित्रपटांनंतर तिच्या फॅन फॉलोइंगमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तिचं अभिनय, प्रसारमाध्यमांसमोर वावरणं आणि त्यांच्या प्रश्नांना बेधडक उत्तर देणं यासाठी ती चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये तिने अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून सारा आणि कार्तिकचं नाव जोडलं गेलं. पण एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सध्या सारा आणि कार्तिक नव्हे तर सारा आणि सुशांत सिंह राजपूत यांच्यात काहीतरी शिजतंय.

अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटातून साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत सुशांत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगली मैत्री जमली आहे. नुकताच सुशांतने त्याचा ३३वा वाढदिवस साजरा केला. या खास दिवसासाठी साराने तिची देहरादून ट्रीप लवकर आटपली. वाढदिवसाच्या रात्री सारा केक घेऊन सुशांतच्या घरी गेली आणि त्यानंतर दोघेही डिनरसाठी बाहेर गेले. डिनरनंतर सुशांतने साराला तिच्या घरी सोडलं. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं पाहून सारा-सुशांत बी-टाऊनचे नवीन लव्ह-बर्ड्स आहेत का अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘केदारनाथ’नंतर सुशांतला तब्बल बारा चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आहेत. तर सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण धवनसोबत झळकणार आहे.