24 October 2020

News Flash

‘अर्जुन रेड्डी’मधील अभिनेत्रीची बॉलिवूडमध्ये एंट्री

'या' अतरंगी अभिनेत्यासोबत करणार स्क्रिन शेअर

आपल्या बिनधास्त व अनोख्या शैलीसाठी चर्चेत राहाणारा रणवीर सिंग सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सिनेसृष्टीतील अनेक मोठ्या अभिनेत्री त्याच्यासोबत रुपेरी पडद्यावर झळकण्यास उत्सुक आहेत. दरम्यान रणवीर आपल्या आगामी चित्रपटात अभिनेत्री शालिनी पांडेसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

अतरंगी रणवीर दिसणार ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत

अर्जुन रेड्डी या तामिळ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या शालिनीचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. शालिनी रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘जयेशभाई जोरदार’ असे आहे. हा एक विनोदी चित्रपट आहे. यश राज फिल्मच्या ट्विटर हँडलवरुन या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असुन पुढल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ‘जयेशभाई जोरदार’ प्रदर्शित होणार आहे.

रेखा यांच्याशी स्वतःची तुलना करणाऱ्या साराची वरूण धवननं घेतली फिरकी

‘कांदा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवा’, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

“यशराज बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळावी, हे प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. आज माझे ते स्वप्न पूर्ण झाले आहे. मी खुप आनंदी आहे, कारण मला माझ्या पहिल्याच हिंदी चित्रपटात रणवीर सिंग सारख्या अष्टपैलु अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे.” अशा शब्दात शालिनीने आपला आनंद व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 2:27 pm

Web Title: arjun reddy actress shalini pandey to make her bollywood debut with ranveer singhs jayeshbhai jordaar mppg 94
Next Stories
1 उर्वशी रौतेला डेट करते या क्रिकेटरला?
2 अतरंगी रणवीर दिसणार ‘सुपरहिरो’च्या भूमिकेत
3 Video : ‘तान्हाजी’मधील ‘माय भवानी’ गाणं प्रदर्शित
Just Now!
X