News Flash

पाहा अरनॉल्डच्या आगामी ‘टर्मिनेटर’ चित्रपटाचा ट्रेलर

तंत्रज्ञानावर आधारित सुपरहिरो साकारणारा आणि तो गाजवणारा हॉलिवूडचा अॅक्शन हिरो अरनॉल्ड श्वार्झनेगर पुन्हा एकदा आपल्या 'टर्मिनेटर' अवतारात परतला आहे.

| January 30, 2015 03:56 am

terminator-450तंत्रज्ञानावर आधारित सुपरहिरो साकारणारा आणि तो गाजवणारा हॉलिवूडचा अॅक्शन हिरो अरनॉल्ड श्वार्झनेगर पुन्हा एकदा आपल्या ‘टर्मिनेटर’ अवतारात परतला आहे. १९८४ साली आलेला जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘टर्मिनेटर’ या साय-फाय पटाने लोकांवर घातलेली मोहिनी आजही कायम आहे. या चित्रपटातून सुपरहिरो म्हणून पडद्यावर आलेला अरनॉल्डने आपला एक चाहतावर्ग निर्माण केला. ‘टर्मिनेटर’च्या या पाचव्या सिक्वलमध्ये तो पुन्हा एकदा पूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘टर्मिनेटर’च्या या नव्या आणि पाचव्या सिक्वलचे नावसुद्धा अरनॉल्डनेच ठेवले असून, ही संधी दिल्याबद्दल त्याने चित्रपटकर्त्यांचे आभार मानले आहेत. ‘टर्मिनेटर जेनेसिस’ असे या पाचव्या चित्रपटाचे नाव असून, १ जुलै रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटकर्त्यांकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. अरनॉल्डचे वय वाढले असले, तरी त्याच्यातील स्फुर्ती आणि जोश जराही कमी झाला नसल्याचे यात पाहायला मिळते.
(छाया सौजन्य – फेसबूक)

पाहा ‘टर्मिनेटर जेनेसिस’चा ट्रेलर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2015 3:56 am

Web Title: arnolds terminator genysis trailer
Next Stories
1 रिव्हिल: ‘दंगल’मधील आमिरचा नवा लूक
2 रुपेरी पडद्यावर चमकणार आणखी एक स्टार पुत्र
3 चाहत्यांसाठी जॅकलिनचे रेखाटन
Just Now!
X