गेली काही दशके बॉलिवूडमध्ये पार्श्वगायक म्हणून नावलौकिक कमावलेल्या, पार्श्वगायनाच्या जोरावरच आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्रसिध्द गायक शान यांनी आता नव्या पिढीने पाश्र्वगायन विसरायला हवे, असा सूर आळवला आहे. चित्रपटसंगीत लोकांना आता फारसे आवडत नाही, मोठमोठ्या चित्रपटातील एखाददुसरे गाणे लोकांना आठवते, त्यापलिकडे लोक चित्रपटसंगीताची दखल घेत नाहीत. उलट नव्या पिढीने खासगी अल्बम्सवर भर द्यायला हवा, असा सल्लाही शान यांनी दिला आहे.

शान यांनी संगीतक्षेत्रात प्रवेश के ला तेव्हा पॉप संगीताची चलती होती. खुद्द शान यांनी सुरूवातीच्या काळात आपल्या गाण्यांचे अल्बम्स के ले होते. गायक म्हणून ओळख आणि प्रसिध्दी मिळाल्यानंतर मात्र शान यांनी चित्रपटसंगीतातही पार्श्वगायक म्हणून आपला जम बसवला. आता मात्र चित्रपट संगीतालाही महत्व उरलेले नाही, परिणामी पाश्र्वागायनात फारशा संधी नसल्याचे त्यांनी स्पष्ट के ले आहे. ‘झी टीव्ही’वरील ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाशी शान जोडले गेले आहेत. हा शो खेळाच्या स्वरूपात असल्याने तो अधिक मनोरंजक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लोकांनी चित्रपटातील गाणीच ऐकणं बंद के लेलं आहे. एके काळी चित्रपट संगीताला जी लोकप्रियता होती ती आता उरलेली नाही. आम्ही जेव्हा पार्श्वगायक म्हणून काम करत होतो तेव्हा आम्ही गायलेल्या गाणी ऐक ली जायची, त्यावर लोकांमध्ये चर्चा व्हायची. आता एखादा मोठा चित्रपट असेल तर त्यातील एखाददुसरे गाणेच लोकांना माहिती असते, तेही त्या गाण्याची खूप प्रसिध्दी झाली असेल तरच ते लोकांपर्यंत पोहोचते. अन्यथा चित्रपट संगीताकडे असलेला लोकांचा कल कमी झाला आहे’, अशी खंत शान यांनी व्यक्त के ली.

अर्थात, संगीताच्या क्षेत्रात नवनव्या गायक-गायिकांचा प्रवाह येतच असतो. जुन्यांनी स्वत: बाजूला होऊन नव्यांना या क्षेत्रात वाट देण्याचा शिरस्ता अजूनही सुरू आहे, एक गायक म्हणून दीर्घ काळ चित्रपट संगीत क्षेत्रात काम करण्याची संधी आपल्याला मिळाली, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त के ले. त्यामुळे आत्ता पाश्र्वागायन स्वत:हूनच कमी के ले असले तरी त्यात पहिल्यासारखी मजा उरलेली नाही, हे ते पुन्हा पुन्हा सांगतात. गेल्या वर्षभरात मी चित्रपटांसाठी चार गाणी गायली आहेत, मात्र ती लोकांना माहितीही नाहीत, याकडे लक्ष वेधत त्यांनी चित्रपटसंगीताची लोकप्रियता का घटते आहे, याची कारणमीमांसाही त्यांनी के ली. आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून ज्याप्रमाणे नायक-नायिकांच्या तोंडी गाणी नसतात, एखाद्या दृश्याच्या पार्श्वभूमीवर गाणी वाजवली जातात. तसाच ट्रेण्ड हिंदी चित्रपटातही बऱ्याच प्रमाणात रुळला आहे. त्यामुळे पार्श्वगायक म्हणून लोकप्रियता मिळण्याची संधी तरूण गायक-गायिकांना फारशी उपलब्ध नाही, असा दावा त्यांनी के ला. एखाद्या गायकाकडे वेगळीच आवाजाची जादू असेल तरच तो लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो, त्याऐवजी चित्रपट संगीतेतर गायनाच्या संधी जास्त लोकप्रियता मिळवून देणाऱ्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या संगीतावर तरूण पिढीचा खूप प्रभाव आहे, त्यांना संगीतातील काय आवडते हे लक्षात घेतले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.