News Flash

‘बालवीर’मधील ही अभिनेत्री अभ्यासातही अव्वल; बारावीच्या परीक्षेत केली चमकदार कामगिरी

१२वीत मिळवले तब्बल इतके टक्के गुण

‘बालवीर’ फेम अभिनेत्री अनुष्का सेन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम चर्चेत असते. मात्र यावेळी अनुष्का तिच्या १२वी च्या रिझल्टमुळे चर्चेत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असतानाही अनुष्काने चांगला अभ्यास करुन १२वीत ८९.४ टक्के मिळवले आहेत. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बारावीचा निकाल सोमवारी जाहीर केला. यंदा बारावीचा निकाल ८८.७८ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.३८ टक्क्यांनी वाढ झाली. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या पुणे विभागाचा निकाल ९०.२४ टक्के लागला आहे. यंदा सीबीएसईने गुणवत्ता यादी जाहीर केली नाही.

करोना विषाणू संसर्ग सुरू होण्यापूर्वी सीबीएसई बारावीची परीक्षा सुरू झाली होती. मात्र, वाढत्या संसर्गामुळे काही विषयांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यामुळे सर्व विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या परीक्षेतील कामगिरीनुसार, तीनपेक्षा जास्त विषयांची आणि तीनच विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उर्वरित विषयांची सरासरी काढून मूल्यमापन करण्यात आले. तर एक किंवा दोनच विषयांची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन संबंधित परीक्षेतील कामगिरी आणि अंतर्गत मूल्यमापनानुसार करण्यात आल्याची माहिती सीबीएसईकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 6:27 pm

Web Title: balveer fame anushka sen scored 89 percentage in class 12 mppg 94
Next Stories
1 रेखा यांचा करोना चाचणीसाठी नकार; दिलं ‘हे’ कारण
2 …म्हणून ‘सखाराम बाइंडर’चे पाच प्रयोग केले- मुक्ता बर्वे
3 केतकी चितळेला नेत्याकडून धमकी; फेसबुकवर शेअर केला स्क्रीनशॉट
Just Now!
X