‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ या चित्रपटातून उघड्यावर शौचास बसण्याचा आणि स्वच्छतेचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी आता वीजचोरीचा मुद्दा उचलला आहे. शाहिद कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

देशातल्या वीजचोरीसारख्या मुद्द्यावर भाष्य करणारा हा पहिलाच चित्रपट आहे. मैत्रीच्या नात्यातून दिग्दर्शक श्री नारायण सिंह यांनी हा प्रश्न मांडला आहे. दिव्येंदू शर्मा याने शाहिदच्या मित्राची भूमिका साकारली आहे. दीड लाखाचं वीजबिल भरू न शकल्याने त्याचा हा तणावग्रस्त मित्र आत्महत्या करतो आणि तिथूनच मूळ कथेला सुरुवात होते. या मित्राला न्याय देण्यासाठी शाहिदची धडपड चालू होते. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये सुरुवातीला नेमकं काय घडतंय तेच समजत नाही. दीड मिनिटानंतर चित्रपटाची कथा समजू लागते.

वाचा : आपल्या सोयीनुसारच बोलण्यासाठी स्टारडम नाही; कंगनाचा बॉलिवूड कलाकारांना टोमणा

शाहिद, श्रद्धासोबतच यामध्ये सुधीर पांडे, सुप्रिया पिळगावकर, यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत. भूषण कुमार प्रस्तुत हा चित्रपट २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.