News Flash

बेळगाव येथे होणाऱ्या नाटय़संमेलनाच्या तारखांमध्ये बदल

बेळगाव येथे पुढील वर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे नाटय़संमेलन आता ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत

| November 16, 2014 06:33 am

बेळगाव येथे पुढील वर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. हे नाटय़संमेलन आता ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत होणार असल्याचे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी सांगितले.
या अगोदर नाटय़संमेलन ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०१५ या तारखांना होणार होते. मात्र, बेळगाव येथील ज्या मैदानावर नाटय़संमेलन होणार होते, त्या मैदानावर २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पार पाडल्यानंतर उर्वरित तीन दिवसांच्या अवधीत नाटय़संमेलनाचा मंडप आणि अन्य तयारी करणे शक्य नसल्याने, केवळ याच तांत्रिक कारणामुळे संमेलनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्याचेही जोशी म्हणाले.
ज्येष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:33 am

Web Title: belgaum natya sammelan dates changed
टॅग : Natya Sammelan
Next Stories
1 ‘चित्रपट आणि मालिका चित्रीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखणार’
2 इमरानचे छम्मा छम्मा!
3 ‘रांझना’ चित्रपटाची कथा मालिका स्वरूपात दिसणार
Just Now!
X