News Flash

ड्रग्ज प्रकरणामुळे भारती सिंहची होणार ‘द कपिल शर्मा शो’मधून हकालपट्टी?

भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती.

कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज प्रकरण चांगलंच भोवताना दिसतंय. अटकेनंतर तिला व तिच्या पतीला जामिन मिळाला असला तरी आता तिच्यावर ‘द कपिल शर्मा शो’ची अडचण उभी राहिली आहे. ड्रग्ज प्रकरणामुळे सोशल मीडियावरील आणि एकंदरीत भारतीच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सोनी टीव्ही तिला ‘द कपिल शर्मा शो’मधून काढून टाकण्याचा विचार करतेय.

सोनी टीव्हीने अद्याप भारतीविषयी कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. ‘द कपिल शर्मा शो’ हा एक कौटुंबिक शो असल्याने भारतीच्या उपस्थितीवरून नवीन वाद निर्माण होऊ नये म्हणून वाहिनी तिला काढण्याचा विचार करतेय. तर दुसरीकडे कपिल या निर्णयाविरोधात असल्याचं कळतंय.

आणखी वाचा : वर्षभरात ‘या’ मराठी कलाकारांच्या निधनाच्या वृत्ताने दिला चाहत्यांना धक्का

भारती व तिचा पती हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला ८० ग्रॅमपेक्षा जास्त गांजा मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 7:55 pm

Web Title: bharti singh might be thrown out of the kapil sharma show because of drugs case ssv 92
Next Stories
1 VIDEO : चहलची होणारी पत्नी धनश्रीचा अफलातून डान्स पाहिलात का?
2 निकाहनंतर पहिल्यांदाच पतीसोबत फिरायला गेली सना, पाहा व्हिडीओ
3 झी युवावर रविवारी उडणार ‘धुरळा’
Just Now!
X