News Flash

या दोन स्पर्धकांना विकास गुप्ता देणार बक्षिसाची रक्कम

या दोन स्पर्धकांमध्ये विकासने त्याला मिळालेली रक्कम विभागण्याचा निर्णय घेतला आहे.

विकास गुप्ता, अर्शी खान

‘भाभीजी घर पर है’ फेम शिल्पा शिंदे हिने नुकतेच ‘बिग बॉस ११’चे विजेतेपद पटकावले. १४ जानेवारीला वादग्रस्त शो बिग बॉसच्या ११व्या सीझनने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदाच्या सीझनमध्ये अभिनेत्री हिना खानला दुसऱ्या तर विकास गुप्ताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. अगदी योग्य खेळी खेळून विकासने अनेकांचेच मन जिंकले होते. बिग बॉसमधील ‘मास्टरमाइंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकासला तेव्हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदारही समजले जात होते. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत त्याची जवळीक होती. त्यातील काहींनी तर तो जिंकावा यासाठी त्याचा मार्गही मोकळा करून दिला होता.

वाचा : भविष्यात हिनाचे तोंड पाहण्याची माझी इच्छा नाही- शिल्पा शिंदे

नुकतीच एका मुलाखतीत विकासची भावनिक बाजू पाहावयास मिळाली. बिग बॉसमधून सहा लाख रुपये जिंकलेल्या या निर्मात्याने त्याचे बक्षीस अर्शी खान आणि ज्योती कुमारी या दोन स्पर्धकांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे.

याविषयी विकास म्हणाला की, ‘होय, मी त्या दोघींना प्रत्येकी तीन लाख रुपये देणार आहे. संपूर्ण घर माझ्या विरोधात असताना ज्योती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. कोणीही माझ्या विकास भाईविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असे म्हणत तिने मला पाठिंबा दिला. बिहारच्या एका छोट्या शहरातून आलेल्या या २० वर्षीय मुलीमुळे मला धैर्य मिळाले. त्या एका घटनेमुळे बिग बॉसच्या घरात राहण्याचे सामर्थ्य मला मिळाले. अर्शीसुद्धा माझ्या संरक्षकाप्रमाणे होती. या शोपेक्षा तिने माझी एक मैत्रीण म्हणून अधिक काळजी घेतली.’

वाचा : ट्रॅफिक पोलिसाच्या भूमिकेत भाव खातेय बॉलिवूडची ‘मस्तानी’

‘भाभीजी घर पर है’ या प्रसिद्ध मालिकेचा विकास निर्माता आहे. काही कारणांमुळे याच मालिकेतून शिल्पा शिंदेने काढता पाय घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 3:49 pm

Web Title: bigg boss 11 vikas gupta divides his prize money between 2 contestants find out who
Next Stories
1 एक चाहता असाही..
2 मॉडेल अर्पिता तिवारीची हत्याच!
3 आलिया भट्ट, रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ सिनेमाचे फोटो लीक
Just Now!
X