News Flash

बर्थ डे गर्ल दिशा पटानीच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

दिशा पटानीने  २०१५ सालात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. 'लोफर' या सिनेमात ती पहिल्यांदा झळकली होती.

(photo-instagram/youtube)

अभिनेत्री दिशा पटानी आज तिचा २९वा वाढदिवस साजरा करतेय. यानिमित्ताने सोशल मीडियावर दिशाला तिचे चाहते आणि अनेक सेलेब्रिटी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दिशाच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिचा पहिल्या ऑडिशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिशा अवघ्या १९ वर्षांची असतानाचा हा व्हिडीओ आहे. यात आतापेक्षा दिशा खूप वेगळी दिसत असली तरी ती सुंदर दिसतेय.

या व्हिडीओच्या सुरुवातील दिशा तिच्याबद्दल माहिती देताना दिसतेय. यावेळी ती तिचं वय़ १९ असल्याचं सांगते. त्यानंतर दिशा तिचे डायलॉग म्हणू लागते. एका कोल्ड क्रिमच्या जाहिरासाठी ती ऑडिशन देत असल्याचं हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं. यात ती वेगवेगळ्या स्टाइलने डायलॉग म्हणताना दिसते. यात दिशाचा उत्तम कॉन्फिडन्स दिसून येतोय.

पहा फोटो: ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या दिशा पटानीकडे आज ५ कोटींचा फ्लॅट

हे देखील वाचा: “असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस”, ट्रोल करणाऱ्या युजरची लिसा हेडनने केली बोलती बंद

दिशाच्या आडिशनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलह होत आहे. दिशा पटानीने  २०१५ सालात अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. ‘लोफर’ या सिनेमात ती पहिल्यांदा अभिनेता वरुण तेजसोबत झळकली होती.
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनीची बायोपिक असलेल्या ‘धोनी- एन अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात दिशाला महत्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात दिशाने महेंद्र सिंह धोनीच्या पहिल्या प्रेयसीची म्हणजेच प्रियांका ही महत्वाची भूमिका साकारली होती. सुशांत सिंह राजपूतनसोबत ती या सिनेमात झळकली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 2:19 pm

Web Title: birthday girl disha patani first audition video goes viral on social media when she was 19 years old kpw 89
Next Stories
1 “असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस”, ट्रोल करणाऱ्या युजरची लिसा हेडनने केली बोलती बंद
2 सनी लिओनीने पतीसह ‘लंदन ठुमकदा’ गाण्यावर लावले ठूमके; व्हिडीओ होतोय व्हायरल
3 “मी दुसरा सुशांत सिंह राजपूत बनणार नाही “; केआरकेची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
Just Now!
X