अमिताभ बच्चन अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावरही चांगलेच अॅक्टीव्ह आहेत. अनेकदा ते त्यांचे विचार, मत सोशल मीडियावर बेधडकपणे मांडत असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. अलिकडेच बिग बींनी अयोध्या नगरीचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

दिवाळी असल्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक जण प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहे. यामध्येच सेलिब्रिटीदेखील ट्विटर, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. यामध्येच बिग बींनीदेखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांची पोस्ट पाहिल्यावर अनेकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

‘इतक्या लवकर अयोध्येची आठवण झाली का?’, असं एका नेटकऱ्याने विचारलं आहे. तर ‘अमिताभ सर, दिवाळीची स्पेलिंग चुकवलीत’, असं अन्य एका युजरने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अमिताभ बच्चन हे कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतात. यापूर्वीदेखील ते अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. मात्र, ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं.