News Flash

अभिनेते आशुतोष राणा यांना करोनाची लागण ; सात दिवसांपूर्वी घेतली होती लस

रेणुका शहाणे यांनी व्यक्त केली होती चिंता

बॉलिवूडमधी प्रसिद्ध अभिनेते आशुतोष राणा यांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे सात दिवसांपूर्वीच त्यांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली होती. 6 एप्रिलला आशुतोष राणा यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. करोनाची लागण झाल्यानंतर ते होम क्वारंटाइन झाले आहेत.

आशुतोष राणा यांची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी एक फोटो शेअर करत दोघांनी लस घेतल्याची माहिती दिली होती. रेणुका शहाणे यांनी लसीकरण केंद्रातील एक फोटो पोस्ट करत तिथल्या डाक्टरांचे आणि टीमचे आभार मानले होते.

रेणुका शहाणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या, “कोविड लसीकरण केंद्राच्या सर्व वैद्यकीय चिकित्सकांचे, परिचारिकांचे विशेष आभार. आज आम्ही लसिकरणाचा पहिला डोस घेतला. लसीकरण करून घ्या व आवर्जून मास्क लावा, सामाजिक अंतर ठेवा व हात सॅनिटाईझ करत रहा.” असं ट्विट त्यांनी केलं होतं.

त्याचसोबत 11 एप्रिलला त्यांनी एक ट्विट करत चिंता व्यक्त केली होती. मुंबईत शनिवार आणि रविवार लॉकडाउन असतानाही काही लोक गर्दी करत असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. “पोशा नाखवा क्रीडांगण, यारी रोड मध्ये साधारण पन्नासहून अधिक लोक क्रिकेट व इतर खेळ खेळत आहेत. कोणीच मास्क लावलेले नाही आहेत. अशा बेजबाबदार वागण्याने महामारी संपेल? काही आपल्या लहान मुलांना बाहेर फिरायला नेत आहेत, विना मास्क! मुंबईत शनिवार व रविवार लाॅकडाऊन नाही आहे का?” असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला होता.

आलिया भट्टची करोना चाचणी नेगेटिव्ह; फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 4:45 pm

Web Title: bollywood actor asutosh rana tested covid 19 positive after taking first dose of vaccine kpw 89
Next Stories
1 झोपताना ‘या’ तीन गोष्टी असतात करीनाच्या सोबत…”वाईनची बाटली, पजामा आणि….!”
2 असं आहे मलायका अरोराचं ‘वर्क फ्रॉम होम’; फोटो शेअर करत चाहत्यांना म्हणाली…
3 “मसाबा गुप्ता की ‘कराटे किड’मधला जेडन स्मिथ?’ चाहत्यांचा पडला प्रश्न!
Just Now!
X