13 August 2020

News Flash

ज्याचे सिनेमे करतात १००० कोटींची कमाई, तो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे सातवी नापास

दिग्गज कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं

‘पॅडमॅन’, ‘केसरी’,’मिशन मंगल’ या सारखे सुपरहिट चित्रपट देणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. उत्तम कथानक आणि सशक्त अभिनय यामुळे अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालतो. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटांनी १००० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. अक्षयची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे त्याचे चाहतेदेखील त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अक्षयच्या शालेय जीवनातील एक गोष्ट कदाचित अनेकांना माहित नसेल. सुपरहिट चित्रपट देणारा अक्षय चक्क सातवी नापास आहे.

१९९१ साली ‘सौगंध’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या अक्षयने अलिकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने सातवी नापास असल्याचं सांगितलं.

“मला चांगलंच आठवतंय मी शाळेत असताना सातवीला नापास झालो होतो. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला प्रचंड मारलं होतं. तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं. मला अभिनेता व्हायचं आहे. मात्र बऱ्याच काळानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं”, असं अक्षयने सांगितलं.

दरम्यान, अक्षय सातवी नापास असला तरी आज त्याचा प्रत्येक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करतो. आज दिग्गज कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अक्षय कुमार लवकरच राज मेहता दिग्दर्शिक ‘गुड न्यूज’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री करिना कपूर स्क्रीन शेअर करणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2019 10:29 am

Web Title: bollywood actor recalls wanting to become a hero after he got beaten up by his father for failing class 7 ssj 93
Next Stories
1 तुरुंगात काम करुन मिळालेल्या पैशांचा संजयने केला असा उपयोग
2 पानिपतची रुपेरी गाथा
3 ‘हा’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन
Just Now!
X