News Flash

मुलीच्या बर्थडेला काजोलची भावूक पोस्ट, म्हणाली “तुझ्या जन्मावेळी मी..”

सोशल मीडियावरून दिल्या शुभेच्छा

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची मुलगी न्यासा आज वाढदिवस असून ती 18 वर्षांची झाली आहे. कुठल्याही आई-वडिलांसाठी मुलगी 18 वर्षांती होणं म्हणजे मोठी गोष्ट असते. मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्तानेच काजोलने नास्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहली आहे.

काजोलने मुलगी न्यासाचा बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती कॅप्शनमध्ये म्हणाली,” तुझा जन्म झाला तेव्हा मी खूप चिंतेत होते. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा होती आणि मी त्या सर्व भीती आणि चिंतेतून एकवर्ष काढलं. तू 10 वर्षांची झालीस तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी बराच काळ तर विद्यार्थी होते आणि परिस्थितीतून मार्ग काढायला शिकत होते. अखेर आज मी म्हणू शकते की मी खूप साऱ्य़ा आनंदाने पास झाली आहे. खूप उंच उड..इतरांसाठी तुझ्यातील चैत्यन्य कमी होऊ देऊ नकोस , तुझ्या सर्व गुणांचा वापर चांगल्या कामांसाठी कर.” अशा आशयाची पोस्ट करत काजोलने मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलच्या या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्री दिय मिर्झा आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता अजय देवगण यानेदेखील न्यासासोबतच एक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजय आणि काजोलची मुलगी नास्या सध्या सिंगापूरमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करतेय. नास्या ही कायम बॉलिवूडपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 1:46 pm

Web Title: bollywood actress kajol share emotional note on daughter nyasas birthday kpw 89
Next Stories
1 “….म्हणून ‘चेहरे’च्या पोस्टरवर नव्हता रिया चक्रवर्तीचा उल्लेख”; जाणून घ्या कारण!
2 “हे बघा पळपुटे” ; मालदीव ट्रीपमुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ट्रोल
3 मालदिवला पोहोचल्यावर अभिनेत्याची करोना चाचणी आली पॉझिटिव्ह अन्…
Just Now!
X