News Flash

‘त्या’ व्यापाऱ्याविरोधात शिल्पा-राजने ठोकला १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

कुंद्रा दाम्पत्याने गेल्या वर्षभरात व्यापाऱ्यांना फसवल्याची चर्चा होती

शिल्पा शेट्टी

काही दिवसांपूर्वीच एका व्यापाऱ्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्राविरोधात २४ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याच व्यापाऱ्याविरोधात आता शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्राने १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

कापड व्यापारी रवि मोहनलाल भलोटियाने केलेल्या आरोपामध्ये त्याने शिल्पा, राज कुंद्रा यांनी इतर तीन (दर्शित इंद्रवदन शाह, उदय कोठारी, वेदांत बाली) यांनी आपल्याला २४ लाखांचा गंडा घातल्याचे म्हटले होते. या सर्वांनी मिळून आपल्या नावाने पैसे घेतले खरे पण, ते पैसे काही आपल्यापर्यंच आलेच नाहीत, असा आरोप भलोटियाने केला होता. इतकंच नव्हे तर भलोटियाने जाहीरपणे राज आणि शिल्पा यांना काही अपशब्द आणि अपमानास्पद वक्तव्य करुनही संबोधलं होतं. हा सर्व प्रकार पाहता राज कुंद्राने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्याने दाखल केलेल्या याचिकेविषयी प्रवक्त्यांनी केलेल्या विधानानुसार राज आणि शिल्पाने रवि मोहनलाल भलोटियावर १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून हे प्रकरण बरंच चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी व उद्योगपती राज कुंद्रा या दाम्पत्याने ‘बेस्ट डील’ कंपनीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात देशभरातील अनेक व्यापाऱ्यांना फसवलं असल्याची माहिती समोर आली होती. या दोघांनी व्यापाऱ्यांना सुमारे १८ कोटी रुपयांनी गंडा घातल्याचा संशय आहे. पोलीस चौकशीत खरी माहिती बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया तक्रारदार रवि भालोटिया यांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 10:29 am

Web Title: bollywood actress shilpa shetty and her husband raj kundra slap rs 100 crore defamation suit against accuser cheating case
Next Stories
1 ‘माझ्या मुलांनी माझ्या नावाचा फायदा घेण्यात गैर काय?’
2 कथा पडद्यामागचीः …आणि ते मला शोधत होते
3 सुशांत- क्रितीच्या नात्यात ‘लंबियां सी जुदाइयां’
Just Now!
X