News Flash

बॉलिवूडच्या दिवाळी पार्ट्यांना करोनाचं ग्रहण

कलाविश्वातील प्रत्येक सण, उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात, पण...

एखादा सण किंवा उत्सव असला की सगळ्यांचं लक्ष लागतं ते म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींकडे. कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरची दिवाळी, दसरा किंवा होळी हे सण, उत्सव हे धुमधडाक्यात साजरे करण्यात येतात. यात करण जोहर, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन यांच्या घरी होणाऱ्या पार्ट्या, सेलिब्रेशन साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यंदा करोनाचं सावट असल्यामुळे अनेक सेलिब्रिटींच्या घरी यंदाची दिवाळी ही अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळेच यंदा अत्यंत साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करणारे सेलिब्रिटी कोणते ते जाणून घेऊयात.

१. करण जोहर –

प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक यांच्या घरी दरवर्षी दिवाळीनिमित्त पार्टीचं आयोजन करण्यात येतं. यात त्याचे मित्र-परिवार व आप्तेष्टांचा समावेश असतो. मात्र, यंदा करोनाचं सावट असल्यांमुळे करणच्या घरी कोणत्याही पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं नाही.

२. एकता कपूर –

टेलिव्हिजन विश्वातील क्वीन अर्थात एकता कपूर हे नाव कोणालाही नवीन नाही. एकताच्या मालिकांप्रमाणेच तिच्या घरी होणाऱ्या पार्ट्यादेखील चर्चेत असतात. एकताने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूड दिग्गजांपर्यंत अनेक जण सहभागी होत असतात.

३. शाहरुख खान –

करोनाचं संकट असल्यामुळे यंदा शाहरुख खानच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

४. सलमान खान-

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यांच्या घरी प्रत्येक सण, उत्सवाचं दणक्यात सेलिब्रेशन केलं जातं. गणपती असो किंवा दिवाळी सलमान सेलिब्रेशन करण्यात कायमच अग्रेसर असतो. मात्र, यंदा त्याच्या घरीदेखील दिवाळी पार्टी नसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 2:43 pm

Web Title: bollywood celebs famous diwali party will not be same this year because corona dcp 98
Next Stories
1 कंगनाने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; ईद आणि ख्रिसमसवर साधला निशाणा, म्हणाली…
2 कोरिअन भयपटात अनुराग कश्यपचं म्युझिक; ट्रेलर पाहून तुम्हालाही भरेल धडकी
3 …म्हणून आर्या आंबेकरसाठी खास आहे ‘ही’ साडी
Just Now!
X