X

काजोलच्या लेकीचा डान्स पाहिला का?, ‘बोले चुडिया’ गाण्यावर नास्याचे ठुमके

आईच्या सुपरहिट गाण्यांवर नास्याचा जबरदस्त डान्स

बॉलिवूडचं लोकप्रिय कपल काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा सध्या सिंगापूरमध्ये तिचं शालेय शिक्षण पूर्ण करतेय. नुकताच नास्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. शाळेतील एका कार्यक्रमात न्याया आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आईच्या म्हणजेच काजोलच्या गाण्यावर डान्स करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतय. नास्याच्य़ा एका फॅनग्रुपने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमातील ‘बोले चुडिया’ या लोकप्रिय गाण्यावर नास्या आणि तिचे वर्गमित्र डान्स करताना दिसत आहेत. सिनेमातील या गाण्यात बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन त्याचप्रमाणे शाहरुख खान, काजोलची जोडी आणि बऱ्याच कलाकारांनी ठेका धरला होता. काजोलच्या याच हिट गाण्यावर तिच्या लेकीने ठेका धरत धमाल केल्याचं पाहायला मिळतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa devgan  (@nysadevganx)

या व्हिडीओत नास्या जबरदस्त डान्स करताना दिसतेय. पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि भरजरी स्कर्ट घालून ती ठुमके देतेय. फक्त बोले चुडिया’ या गाण्यावर नाही तर पुढे तिने ‘माय नेम इज खान’ सिनेमातील ‘सजदा’ आणि ‘तेरे नैया’ गाण्यावरही  डान्सची मजा लुटली. शेवटी नास्याने ‘नगाडा’ गाण्यावर तिच्या वर्ग मित्रांसोबत धमाल डान्स केला आहे.

नास्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट असून ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र तिचं अकाऊंट प्रायव्हेट आहे. असं असलं तरी नास्याचे फॅनग्रुप अनेक असून ते इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक पोस्ट शेअर करत असतात.

22
READ IN APP
X