News Flash

अँजिओप्लास्टीनंतर अनुराग कश्यपचा पहिला फोटो व्हायरल, फोटो पाहून नेटकरी हैराण

अनुरागची मुलगी आलिया कश्यपने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लहानसा व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर अनुराग कश्यपवर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून अनुराग आरोग्याशी संबंधीत समस्यांना समोरे जात होता. मात्र, जास्त त्रास होऊ लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्याची अँजिओप्लास्टी झाली. त्यानंतर आता अनुरागच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. अँजिओप्लास्टीनंतर अनुरागचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून मात्र अनेक जण हैराण झाले आहेत.

अनुरागची मुलगी आलिया कश्यपने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक लहानसा व्हिडीओ शेअर केला आहे. रुग्णालयात असतानाच आलियाने अनुरागचा हा व्हिडीओ शेअर केलाय. यात अनुराग खूपच वेगळा दिसतोय. त्याच्या डोक्यावर टक्कल दिसतंय. गळ्यात मास्क लटकलेलं आहे. मात्र अशातही त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसतंय. त्यामुळे अनुरागची प्रकृती सुधारल्याचं लक्षात येतंय.

(photo-instagram/instastory/aaliyahkashyap)

आणखी वाचा: विनोदी अभिनेता भूषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचा करोनामुळे मृत्यू

अनुराग कश्यपने आजवर अनेक उत्तम सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलंय. यात गँगस् ऑफ वासेपूर, ब्लॅक फ्रायडे, देव डी, गुलाल,मनमर्ज‍ियां अशा अनेक सिनेमांची निर्मिती अनुरागने केलीय. लवकरच अनुरागचा ‘दोबारा’ सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 12:28 pm

Web Title: bollywood producer anurag kashyap first look after angioplasty is so different netizens shocked kpw 89
Next Stories
1 “माझ्या सारख्या स्टारसोबत लग्न करशील?”, जेव्हा शाहरुख खानने प्रियांका चोप्राला विचारला प्रश्न!
2 बलात्कार केल्याचा मॉडेलचा आरोप; प्रसिद्ध फोटोग्राफरविरुद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा
3 विनोदी अभिनेता भूषण कडूवर कोसळला दु:खाचा डोंगर, पत्नीचा करोनामुळे मृत्यू
Just Now!
X