X
Advertisement

करोना पॉझिटिव्ह पतीसोबत रोमान्स करतेय शिल्पा शेट्टी; “करोना प्यार है…”

सोशल मीडियावर शेअर केले फोटोज

बॉलिवूडची ‘फिट अॅण्ड फाईन’ अभिनेत्री शिल्पा शेट्टीने नुकतंच तिच्या सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती पती राज कुंद्रासोबत रोमान्स करताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्राचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. पती राज कुंद्रासोबतचे फोटोज शेअर करताना शिल्पा शेट्टीने काही हॅशटॅग देखील वापरले आहेत. पती राज कुंद्राचा क्वारंटाइन पिरियड देखील संपला असल्याचं यात शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.

शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिल्पा तिचा पती राज कुंद्रांसोबत नजरेला नजर मिळवताना दिसून आली. पण या दोघांमध्ये एक काचेची भिंत ठेवण्यात आलेली आहे. हे फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “करोना काळातलं प्रेम”. सोबतच तिने या पोस्टमध्ये पती राज कुंद्राला देखील टॅग केलंय. या फोटोमध्ये शिल्पा शेट्टीने तिच्या चेहऱ्यावर दोन मास्क लावलेले दिसून आली. तर दुसरीकडे पती राज कुंद्रा काचेच्या भिंतीच्या पलीकडून दिसून येत आहे. यात राज कुंद्रा यांनी चेहऱ्यावर मास्क लावलेला नव्हता. हे फोटोज शेअर करताना शिल्पा शेट्टीने पुढे लिहिलं, “करोना प्यार है…तुम्हा सर्वांच्या शुभकामना, चिंता आणि प्रार्थनेसाठी खूप खूप आभार…”

गेल्या ७ मे च्या दिवशी शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करून पती राज कुंद्रा, मुलगी समिक्षा आणि मुलगा विवान यांच्यासह संपूर्ण कुटूंबच करोना पॉझिटिव्ह आले असल्याचं जाहीर केलं. परंतू शिल्पा शेट्टीचे रिपोर्ट करोना निगेटिव्ह आले आहेत.

यासंदर्भात बोलताना शिल्पा शेट्टी म्हणाली, “मागचे १० दिवस माझ्यासाठी खूप अवघड गेले…माझ्या सासू-सासऱ्यांचे रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले…त्यांच्यानंतर राज कुंद्रा, समिक्षा आणि विवान यांचे ही रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आले… माझी आई सुद्धा करोनाच्या जाळ्यात अडकली आहे…सगळेच जण आपआपल्या खोलीत आयसोलेशनमध्ये आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं पालन करीत आहेत…आमच्या घरातील दोन कर्मचारी सुद्धा करोना पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरू आहेत…देवाच्या आशिर्वादामुळे सगळेच जण आता बरे होऊ लागले आहेत…मुंबई महापालिकेची मी आभारी आहे…! “.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची लव्ह स्टोरी एका चित्रपटापेक्षा ही काही कमी नाही. एकमेंकावर आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर आज हे दोघेही एकमेकांसोबत आहेत आणि सुखाचा संसार करत आहेत. शिल्पा आणि राज यांची भेट एका बिझनेस ट्रीपमध्ये झाली होती. या ट्रीपमध्ये शिल्पाचा परफ्यूम ब्रॅंड ‘एस-2 (S2)’ च्या प्रमोशनसाठी राज कुंद्रा तिला मदत करत होता. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. जेव्हा ते एकमेकांनी डेट करत असल्याच्या बातम्या आल्या तेव्हा त्यांना त्यांच्यातील नात्याबद्दल विचारलं गेलं. तेव्हा राज कुंद्राने ते केवळ एक बिझनेस रिलेशनशीपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर अखेर २२ नोव्हेंबर २००९ मध्ये ते विवाह बंधनात अडकले.

24
READ IN APP
X