News Flash

सलमाननंतर ‘हा’ अभिनेता करतोय शेतात काम, पाहा व्हिडीओ

त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता आणखी एका अभिनेत्याचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अभिनेता राजपाल यादवचा आहे. सध्या राजपाल यादव गावी आहे. तो तेथील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो शेतात काम करताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये राजपाल यादव ‘घराचे काम असो किंवा शेतातील मातीमध्ये काम असो. प्रत्येकाला काम हे करायलाच हवे. मला काम करायला आवडते’ असे बोलताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ आता पर्यंत २ लाख २० हजार लोकांनी पाहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 6:15 pm

Web Title: comedian rajpal yadav working at farm with hoe video viral on internet avb 95
Next Stories
1 शकुंतला देवींचा World Record; ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडूनही शिक्कामोर्तब
2 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण; ‘ईडी’ही करणार चौकशी, पोलिसांकडे मागितली माहिती
3 “2020-लॉकडाउन इन डोंबिवली, 2021-अनलॉक इन झोंबिवली” असे का म्हणतोय अमेय वाघ
Just Now!
X