17 January 2021

News Flash

वादात सरले सारे..

वर्षांच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

मानसी जोशी

हिंदी चित्रपटसृष्टी आणि वाद यांचे नाते काही नवीन नाही. कोणताही नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की, वादाला तोंड फुटते. कधी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी हा वाद मुद्दाम निर्माणही केला जातो. या वादामुळे त्या चित्रपटाची काही दिवस चर्चाही होते. आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो वाद शमतो.  २०२० हे वर्ष मात्र वादातच सरते आहे. ‘तान्हाजी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘छपाक’ या चित्रपटांवरून झालेले वाद, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, घराणेशाही  या वादांनी हे वर्ष गाजवले. कथा चोरणे, चित्रपटातील कथा, संवाद तसेच दृश्यांवर आक्षेप यामुळे आधीही वाद निर्माण झाले आहेत, मात्र यंदा काही नवीन वादही प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले..

हिंदी चित्रपटसृष्टी आणि वाद यांचे नाते काही नवीन नाही. कोणताही नवीन हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला की, वादाला तोंड फुटते. कधी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हा वाद मुद्दाम निर्माणही केला जातो. या वादामुळे त्या चित्रपटाची काही दिवस चर्चाही होते. आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो वाद शमतो.  २०२० हे वर्ष मात्र वादातच सरते आहे. ‘तान्हाजी’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘छपाक’ या चित्रपटांवरून झालेले वाद, अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, घराणेशाही  या वादांनी हे वर्ष गाजवले. कथा चोरणे, चित्रपटातील कथा, संवाद तसेच दृश्यांवर आक्षेप यामुळे आधीही वाद निर्माण झाले आहेत, मात्र यंदा काही नवीन वादही प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले..

वर्षांच्या सुरुवातीस प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. प्रथम या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद उफाळला. या चित्रपटाचे नाव सर्वप्रथम ‘तानाजी’ असे ठेवण्यात आले. मात्र, तानाजींचे वंशज डॉ. शीतल मालुसरेंनी यावर आक्षेप घेतल्याने चित्रपटाचे शीर्षक बदलून ‘तान्हाजी’ करण्यात आले. चित्रपटाच्या ट्रेलरवर काही शिवप्रेमी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता. ट्रेलरच्या शेवटी झेंडय़ावर ओम चिन्ह दाखवण्यात आले होते. ओम असे चिन्ह असलेला झेंडा कधी अस्तित्वातच नव्हता असा युक्तिवाद करत काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, मात्र सगळ्या वादातून सहीसलामत बाहेर पडून या चित्रपटाने तिकीटबारीवर विक्रमी कमाई के ली.

लक्ष्मी अग्रवाल या तरुणीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याची कहाणी सांगणारा दीपिका पदुकोणचा ‘छपाक’ हा चित्रपटही वादामुळे चांगलाच लक्षात राहिला. लेखक राकेश भारती यांनी तिची कथा ‘ब्लॅक डे’ या नावाने लिहिली असून, त्या संदर्भात इम्पाकडेही नोंदणी करण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी ‘छपाक’च्या निर्मात्यांवर कथा चोरल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच दरम्यान दीपिकाने जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनात तेथे जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. तिची ही जेएनयूची भेट प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे इथपासून ते ती भारतीय नाही असे म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली. त्यामुळे तिच्या या भूमिकेशी सहमत नसलेल्या काही संघटनांनी ‘छपाक’वर बंदी घालण्याची मागणीही केली होती. उत्तर प्रदेश, दिल्ली येथे ‘छपाक’चे पोस्टर जाळण्यात आले.

ऑगस्ट महिन्यात जान्हवी कपूरची प्रमुख भूमिका असलेला ‘गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. यातील काही दृश्यांवर भारतीय वायुसेनेने आक्षेप घेतला असून तसे पत्रही त्यांनी धर्मा प्रॉडक्शन आणि ‘नेटफ्लिक्स’ला पाठवले होते. यामुळे वायुसेनेची चुकीची प्रतिमा पसरवली जात असल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला होता. सक्सेना यांची सहकारी असलेली नम्रता चंदी यांनीही करण जोहरवर खोटी माहिती पसरवण्याचा आरोप केला होता. मी वायुसेनेत प्रशिक्षण घेताना कधीही महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आली नाही. तसेच कारगिलमध्ये गुंजनने नाही तर श्रीविद्यानेही प्रथम विमान उडवले होते. तसेच लेह आणि सियाचीनमध्येही मी सर्वप्रथम विमान उडवल्याचे तिने लेखात म्हटले होते. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. यावर दिल्ली उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. भारतीय वायुसेनेने आक्षेप घेतल्याने या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये काही काळ चांगलीच हवा निर्माण झाली होती. अनेकांनी खास त्यासाठी नेटफ्लिक्सचे पैसे भरून तो चित्रपट पाहिला.

याच वेळेस ऑगस्टमध्ये ‘डिस्ने हॉटस्टार’वर प्रदर्शित झालेल्या ‘सडक २’ला घराणेशाहीच्या वादाचा फटका बसला. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलीवूडमध्ये घराणेशाहीच्या वादाला चांगलेच तोंड फुटले होते. सारा अली खान, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन या स्टार मुलांच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलेच ट्रोल केले. यामुळेच ‘बॉयकॉट सडक’ ही मागणी समाजमाध्यमावर जोर धरू लागली होती. या नकारात्मक प्रसिद्धीचा फायदा मात्र या चित्रपटाला काही झाला नाही.

टाळेबंदीच्या काळात सर्वात जास्त चर्चिल्या  गेलेल्या अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाला तर वादामुळे शीर्षकात बदलही करावा लागला. चित्रपटात लक्ष्मी या देवतेचा उल्लेख केल्याने देवदेवतांचा अपमान केला जात असल्याचे सांगत करणी सेनेने निर्मात्यांना नोटीसही पाठवली होती. तसेच शीर्षकात योग्य तो बदल करण्याची मागणीही केली होती. करणी सेनेच्या विरोधानंतर चित्रपटाचे नाव बदलून ‘लक्ष्मी’ असे करण्यात आले होते.

मीरा नायरच्या ‘द सुटेबल बॉय’ या वेब मालिकेत मंदिरात चुंबनदृश्ये दाखवल्याप्रकरणीही वाद उद्भवला. याच वेळेस ‘पाताल लोक’ या वेबमालिके च्या निमित्ताने जातीवाचक दृश्य असल्याचे सांगत निर्माती अनुष्का शर्माला नोटीसही पाठवण्यात आली होती. यामुळे गोरखा समुदायाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा यात उल्लेख करण्यात आला होता.

कंगना विरुद्ध बॉलीवूड

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावतने घराणेशाहीचा मुद्दा उकरून काढत संपूर्ण बॉलीवूडवर तोंडसुख घ्यायला सुरुवात के ली. के वळ घराणेशाहीच नाही तर बॉलीवूडमध्ये कोणताही वरदहस्त नसताना बाहेरून आलेल्या कलाकारांना इथे कसे एकटे पाडले जाते, त्यांना जाचक करारांमध्ये अडकवले जाते, असे वेगवेगळे आरोप करत तिने करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पदुकोणसारख्या कलाकारांवर टीका के ली. सातत्याने समाजमाध्यमांवरून भूमिका मांडत अनेक कलाकारांची नावे वादात ओढण्याच्या कं गनाच्या कृत्यामुळे ती विरुद्ध बॉलीवूड असे चित्र निर्माण झाले आहे. संधी मिळेल तेव्हा वाद उकरण्याचा हा सिलसिला कं गनाने अजूनही थांबवलेला नाही.

चित्रपटगृह मालक विरुद्ध ओटीटी माध्यम

करोनामुळे आठ महिने चित्रपटगृहे बंद असल्याने निर्मात्यांनी आपले चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित केले होते. शूजित सिरकारचा ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाल्याने आयनॉक्स आणि पीव्हीआर या मल्टीप्लेक्स चेनने नाराजी व्यक्त केली होती. या चित्रपटासंदर्भात लेखक राजीव अग्रवाल यांचा मुलगा अकिरा याने लेखिका जुही चक्रवर्तीवर कथा चोरल्याचा आरोप केला होता. राजीव यांनी एका स्पर्धेत ही कथा पाठवली होती. त्या समितीत जुही सदस्य होती. तिने कोणाचीही परवानगी न घेता ही कथा चोरली असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला होता. हे आरोप मात्र जुही चक्रवर्तीने फेटाळून लावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2020 2:14 am

Web Title: controversies of 2020 in bollywood controversial bollywood movies in 2020 zws 70
Next Stories
1 रणवीर सिंग -महेश बाबू पहिल्यांदाच एकत्र, फोटो शेअर करत रणवीर म्हणाला…
2 ‘कुछ बातों का जवाब सिर्फ…’; अंकिता लोखंडेने शेअर केला खास व्हिडीओ
3 लॉकडाउनच्या काळातही बॉलिवूडला नफा; सैफमुळे झाली ४०० कोटींची कमाई
Just Now!
X