News Flash

प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणणारा कलाकार जॉबलेस होऊ शकत नाही – दलीप ताहिल

'...म्हणून सुशांतला फक्त करिअरची चिंता नसेल'

प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणणारा कलाकार जॉबलेस होऊ शकत नाही – दलीप ताहिल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन एक आठवडा उलटला आहे. १४ जून रोजी त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीव संपवलं. परंतु त्याच्या निधनानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सुशांतने नैराश्यात हे पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे, तर दुसरीकडे बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळल्यामुळे त्याने आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सध्या हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं असून अनेक सेलिब्रिटींनी त्यावर मत मांडली आहेत. यातच अभिनेता दलीप ताहिल यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार अलिकडेच दलीप ताहिल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सुशांत सिंहच्या आत्महत्येविषयी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. “बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवरील आकडेवारीच सगळं काही ठरवत असते आणि सुशांत हा बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवणारा अभिनेता होता. त्यामुळे तिकिट बारीवर भरघोस कमाई करणाऱ्या अभिनेत्याला कधीत बॉयकॉट केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येमागे करिअरमधील चढउतार हे कारण असू शकत नाही. त्यामुळे त्याच्या निधनामागे अनेक कारणं असतील मात्र केवळ करिअर हे एकच कारण असू शकत नाही”, असं दलीप ताहिल म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “काही वेळा दिग्दर्शकांसोबत त्याचे काही मतभेद झाले असतील. बऱ्याच वेळा चित्रपटाच्या करारामध्ये काही समस्या असल्यास कलाकार चिंतेत येतात. पण जो कलाकार प्रेक्षकांची गर्दी चित्रपटगृहापर्यंत खेचू शकतो, तो जॉबलेस नाही होऊ शकत”.

दरम्यान, सुशांतच्या निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. काहींच्या मते, बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून सुशांतने त्याचं जीवन संपवलं असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अनेकांनी सलमान खान, करण जोहर यांना सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2020 1:10 pm

Web Title: dalip tahil says sushant singh rajput was a bankable actor ssj 93
Next Stories
1 लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी
2 “खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली
3 सुशांतचा डान्स पाहून ऋषी कपूर झाले होते उत्साही; थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल…