01 March 2021

News Flash

अजय देवगणचा ‘ दे दे प्यार दे’ सेन्सॉरच्या कात्रीत

या चित्रपटामध्ये अजय देवगण ५० वर्षाच्या व्यक्तीची भूमिका वठविणार आहे

अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ठरत असलेला ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट येत्या १७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण मुख्य भूमिका साकारणार असून अभिनेत्री तब्बू आणि रकुल प्रीत सिंह त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने ‘यू/ए’ प्रमाणपत्र दिलं आहे. मात्र या चित्रपटामधील तीन सीनला सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे.

सेन्सॉरने या चित्रपटातील एका गाण्यात बदल करायला सांगितला असून त्याच्यासोबत दोन सीन आणि त्यातील संवाद बदलण्यास सांगितले आहेत. चित्रपटातील ‘वड्डी शराबन’ या गाण्यामध्ये अभिनेत्री रकुल प्रीत झळकली असून तिच्या हातामध्ये व्हिस्कीची बाटली दाखविण्यात आली आहे. मात्र सेन्सॉरने या सीनला कात्री लावली आहे. सेन्सॉरने रकुलच्या हातात असलेली व्हिस्कीची बाटली बदलून त्याजागी फुलांचा गुच्छ ठेवण्यास सांगितला आहे. यासोबतच ‘परफॉर्मेस बेटर होती है’आणि ‘मंजू जी के आलू ओ हो हो..वही अच्छे हैं..की ये सब झूठ है’, या संवादांसोबतच ते सीनदेखील चित्रपटातून हटविण्यास सांगितले आहेत.

दरम्यान, अकिव अली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये अजय देवगण ५० वर्षाच्या व्यक्तीची भूमिका वठविणार आहे. अजय देवगण आणि तब्बू ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2019 12:09 pm

Web Title: de de pyaar de check out 3 changes censor board has suggested
Next Stories
1 जॅकलिनचा टिकटॉक व्हिडिओ पाहिलात का?
2 जॅकीला ‘हीरो’ करणारं चित्रपटगृह टायगरच्या खेळानंतर आज बंद
3 Game Over teaser : तापसीला लागलंय गेमिंगचं वेड
Just Now!
X