News Flash

‘माल है क्या’ चॅटवर दीपिकानं केला खुलासा, अडचणींमध्ये होणार वाढ?

सध्या दीपिकाची अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजूपत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना ड्रग्ज सेवन प्रकरण समोर आले. या प्रकरणात आज बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोणची अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करत आहे. ही चौकशी सुरु असताना दीपिकाला तिची मॅनेजर करिश्मा समोर काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यावेळी २०१७मधील ड्रग्ज चॅट विषयीदेखील काही प्रश्न विचारण्यात आले.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार एनसीबी करत असलेल्या चौकशीमध्ये दीपिकाने, ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये माल है क्या असे म्हणत ड्रग्जची मागणी केली गेली होती त्या चॅटचा ती एक भाग असल्याचे कबुल केले आहे. हा खुलासा केल्यानंतर दीपिकाच्या अडचणीमध्ये आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशीदरम्यान दीपिकाने अनेक प्रश्नावर मौन बाळगणे पसंत केल्याचे म्हटले जाते.

हा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप २०१७मध्ये तयार करणात आला होता. या ग्रुपमध्ये दीपिकासोबत जया शाह आणि करिश्मा प्रकाश देखील असल्याचे टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच या ग्रुपद्वारे दीपिका आणि करिश्मा ड्रग्ज विषयी बोलत होत्या.

सुशांत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीदरम्यान दीपिका पदूकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर यांची नावे समोर आली होती. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज शनिवारी (२६ सप्टेंबर) रोजी दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची एनसीबी चौकशी सुरु आहे. तसेच काल शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुल प्रीत सिंहची चौकशी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 3:32 pm

Web Title: deepika padukone accepts 2017 drug chats with manager karishma prakash avb 95
Next Stories
1 ‘तुंबाड’नंतर दिग्दर्शक आनंद गांधी यांचं वेब विश्वात पदार्पण; ‘या’ वेब सीरिजची करणार निर्मिती
2 “… मग १२ वकिलांशी चर्चा करण्याची गरज का पडली”, अभिनेत्रीचा दीपिका पदूकोणवर निशाणा
3 “त्यावेळी तुमच्या पत्नीवरही अशा कमेंट येत होत्या का?’; गावसकरांना झरीनचा सवाल
Just Now!
X