News Flash

नोव्हेंबरमध्ये अडकणार दीपिका-रणवीर विवाहबंधनात?

दीपिका आणि रणवीरनंही आपल्या लग्नाबद्दल बोलणं टाळलं. हे दोघंही विवाह बंधनात अडकणार याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये सुरु आहेत.

या दोघांच्या लग्नाविषयी त्यांच्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. अनुष्का-विराट, सोनम -आनंदनंतर आता बॉलिवूडचं सर्वात लाडकं जोडपं रणवीर- दीपिकाही विवाहबंधनात अडकणार आहेत. अर्थात चित्रपटांसारखंच अनेक सेलिब्रिटी आपल्या लग्नाबद्दल अगदी शेवटपर्यंत सस्पेन्स कायम ठेवतात. त्यामुळे याच पावलावर पाऊल ठेवून दीपिका आणि रणवीरनंही आपल्या लग्नाबद्दल बोलणं टाळलं. हे दोघंही विवाह बंधनात अडकणार याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून बी टाऊनमध्ये सुरु आहेत पण दोघांनीही यावर मौन बाळगणच पसंत केलंय. हे जोडपं नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सध्या सुरु आहेत.

बहिण सोनमला हर्षवर्धनकडून लग्नाचं ‘हे’ खास गिफ्ट

डीएनएनं आपल्या खात्रीलायक सुत्रांच्या हवाल्यानुसार हे जोडपं नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे. दीपाकानं आपल्या मेकअपमनपासून ते पीआर आणि तिच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या सहकाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात सुट्टी न घेण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे हे जोडपं नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार असाच तर्क मांडला जात आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधलं सर्वात हिट जोडपं असलं तरीही दोघांनी खुलेपणानं आपल्या नात्याविषयी बोलणं अनेकदा टाळलंच होतं. ‘पद्मावत’ सिनेमा प्रदर्शित होण्याआधी लग्नाच्या विषयावरून या दोघांच्या नात्यात कटुता आली होती अशाही चर्चा होत्या.

रणबीरकडे पाहणा-या दीपिकाला रणवीरने दिलेला ‘अॅग्नी लूक’ व्हायरल !

पण अखेर हा वाद मिटला असून दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त रणवीरच्या कुटुंबियांनी तिला साडी आणि डायमंड सेटही भेट दिला होता. दीपिका आणि रणवीरनं आपल्या लग्नाविषयी मौन बाळगणं पसंद केलं असलं तरी या दोघांच्या लग्नाविषयी त्यांच्या चाहत्यांना मात्र कमालीची उत्सुकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 11:03 am

Web Title: deepika padukone and ranveer singh will married in november
Next Stories
1 …म्हणून स्मृती इराणींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यास कलाकारांचा विरोध
2 म्हणून पुन्हा एकदा ट्विटरच्या कारभारावर भडकले अमिताभ बच्चन
3 कॉमेडियन कपिल शर्माची पत्रकाराला नोटीस, मागितली १०० कोटींची नुकसान भरपाई
Just Now!
X