02 March 2021

News Flash

अनुष्कापेक्षा दीपिका जास्त हॉट – जसप्रीत बुमराह

जसप्रीतला अनुष्का शर्माच्या तुलनेत दीपिका पादुकोण जास्त हॉट वाटते.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. अलीकडेच बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत सलग तीन विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. या विक्रमासह कसोटी क्रमवारीत अव्वल -२ मध्ये पोहोचलेल्या बुमराहने दीपिकाची प्रशंसा केली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्याने अभिनेत्री दीपिका पादुकोण जास्त हॉट वाटते असे म्हटले आहे.

जसप्रीत बुमराहने Zaggle या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील गमतीदार अनुभव सांगितले. दरम्यान त्याला दीपिका पादुकोण व अनुष्का शर्मा या दोघांमधील कोणती अभिनेत्री जास्त हॉट वाटते हा प्रश्न विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न करता त्याने दीपिका पादुकोण हे नाव घेतले. जसप्रीतला अनुष्का शर्माच्या तुलनेत दीपिका पादुकोण जास्त हॉट वाटते.

या नंतर त्याला आलिया भट्ट व परिणीती चोप्रा या दोघांमधील कोणती अभिनेत्री जास्त मजेशीर वाटते? असा प्रश्न विचारणात आला. यावर उत्तर देण्यासाठी त्याने थोडा वेळ घेतला, व त्यानंतर आलिया भट्ट हे नाव घेतले. त्याने आलियाचे अनेक चित्रपट पाहिले आहेत. त्याला तिचा अभिनय इतर अभिनेत्रींच्या तुलनेने जास्त आवडतो. म्हणून त्याला आलिया भट्ट जास्त मजेशीर वाटते असे म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 12:02 pm

Web Title: deepika padukone anushka sharma jasprit bumrah mppg 94
Next Stories
1 आमिरने सुभाष कपूर यांच्यासोबत काम करण्याच्या निर्णयावर तनुश्री संतापली
2 इस्लामसाठी निवृत्ती घेतली मग पुनरागमन का? – कमाल खान
3 सोना मोहपात्राचे अनु मलिकबाबत वादग्रस्त विधान
Just Now!
X