News Flash

दीपिका- नीतूमध्ये आजही ‘स्पेशल’ नाते

ब्रेकअपनंतरही रणबीर, दीपिकामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत

दीपिका पदुकोण आणि नीतू सिंग

अभिनेता रणबीर कपूर याची पूर्वाश्रमीची प्रेयसी दीपिका पदुकोण आणि त्याची आई नीतू कपूर यांचा एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये या दोघी एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहेत. दीपिका आणि नीतू नक्की कशावर गप्पा मारत असतील याचीच उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे. पण हा फोटो पाहून ते कोणत्यातरी विषयावर गहन चर्चा करत असतील असेच वाटते. दीपिकाला काही तरी फार महत्त्वपूर्ण सांगायचे आहे आणि तिचे प्रत्येक शब्द ऐकायची नीतू यांना उत्सुकता असल्याचे या फोटोवरुन दिसते. दीपिका काय बोलतेय हे ऐकण्यासाठी नीतू थोड्या मागे झुकलेल्या दिसत आहेत तर दीपिकाही तेवढ्याच उत्साहाने नीतू यांच्या कानात काही तरी सांगत आहे.

त्या नक्की काय बोलत होत्या ते तर त्यांनाच माहिती पण त्यांचा हा फोटो अनेकांच्या भुवया उंचावणारा आहे हे मात्र नक्की. दीपिका आणि रणबीर जेव्हा एकमेकांना डेट करत होते तेव्हा दीपिका आणि नीतू यांच्यातले संबंधही फार सुरेख होते. नुकत्याच या दोघी एका फॅशन शोच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. या शोदरम्यानही त्या अनेकदा एकमेकींशी संभाषण करताना दिसल्या. पण दीपिका आणि रणबीर यांचा ब्रेकअप नीतू यांच्यामुळे झालेला अशा अफवाही मध्यंतरी पसरल्या होत्या. नीतू यांना दीपिका आवडत नव्हती, त्यामुळेच त्यांचा ब्रेकअप झाला अशा चर्चा बॉलिवूड वर्तुळात रंगलेल्या. पण यात काही तथ्य नसल्याचे कालांतराने पुढे आले.

दीपिकानंतर रणबीरच्या आयुष्यात कतरिना कैफची एण्ट्री झाली. पण, तिच्यासोबतचेही त्याचे प्रेमसंबंध फार काळ टिकले नाही. ब्रेकअपनंतर कतरिना आणि रणबीरमधली दोघांमधली दरी फार वाढली. ते आता एकमेकांसमोर येणेही पसंत करत नाहीत. पण दीपिकाच्या बाबतीत असे काही झाले नाही. ब्रेकअपनंतरही रणबीर, दीपिकामध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आजही ते एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतात. ब्रेकअपनंतर त्यांनी एकत्र केलेल्या ‘तमाशा’, ‘ये जवानी है दिवानी’सारख्या सिनेमातली त्यांची केमिस्ट्री सर्वांनाच पसंत पडली होती. नीतू यांनीही ‘तमाशा’ सिनेमातली रणबीर आणि दीपिकाची केमिस्ट्री त्यांना आवडली असल्याचे अनेकदा सांगितले होते. दरम्यान, आता व्हायरल झालेल्या या फोटोवरुनही नीतू आणि दीपिकामध्ये खास नाते असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

सध्या दीपिका, रणवीर सिंगला डेट करत आहे तर रणबीर अजूनही योग्य मुलीच्या शोधात आहे. पण तरीही नीतू आणि दीपिका रणबीरबाबतच बोलत नव्हत्या ना? असा प्रश्न अनेकांना पडला असून याचे उत्तर जाणून घेण्याची उत्सुकता आता त्यांच्या चाहत्यांना लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2017 2:48 pm

Web Title: deepika padukone caught giggling with neetu kapoor and we wonder if the reason is ranbir kapoor see viral pic
Next Stories
1 शाहरुखच्या मन्नतमध्ये अवतरणार ‘सुपरवूमन’!
2 HT Most Stylish Awards 2017 : ‘एचटी मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड २०१७’ विजेत्यांची संपूर्ण यादी
3 इंग्रजीत ‘फेल’ पण करिअरमध्ये ‘सुपरहिट’!
Just Now!
X