News Flash

जयसाठी विरूची प्रार्थना! बिग बींना करोना झाल्यामुळे धर्मेद्र चिंतेत

अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयी धर्मेंद्र यांना होतेय चिंता

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना करोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बींनी स्वत: ट्विट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या ट्विटमुळे त्यांचे चाहते चिंतेत आहेत. अभिनेता धर्मेंद्र यांनी देखील ट्विटद्वारे बिग बींसाठी प्रार्थना केली आहे.

अवश्य पाहा – “मी भारतीय असल्यामुळे…”; अभिनेत्रीने सांगितला परदेशातील ‘तो’ धक्कादायक अनुभव

अवश्य पाहा – सलमानचं ‘सल्लू’ हे नाव कोणी ठेवलं?; भाईजानने सांगितला आपल्या नावाचा अजब किस्सा

धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन यांच्यामध्ये खूप चांगली मैत्री आहे. बिग बींना करोनाची लागण झाल्यामुळे धर्मेंद्र चिंतेत आहेत. “अमित, लवकर तंदुरुस्त हो. मला माझ्या लहान भावावर विश्वास आहे. तो एक दोन दिवसांत बरा होऊन घरी परतेल. जया तुम्ही चिंता करु नका. सर्व काही ठिक होईल. माझी धाडसी मुलगी… घरातील सर्वांना सांभाळ… मी कायम तुमच्यासोबत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन धर्मेंद्र यांनी बिग बींसाठी प्रार्थना केली आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

देशातील करोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या पुढे गेली आहे. २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर ५१९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख २० हजार ९१६ झाली आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2020 4:56 pm

Web Title: dharmendra tweet on amitabh bachchan mppg 94
Next Stories
1 ‘जय जवान, जय किसान’ म्हणत सलमानने जोडलं काळ्या मातीशी नातं
2 ‘शक्तिमान’मधून किटू गिडवाणीला बाहेर का केलं?; मुकेश खन्नांनी सांगितली इनसाईड स्टोरी
3 फटाक्यांच्या आवाजावर जेवणाऱ्या कुत्र्याला जेव्हा नैराश्य येतं
Just Now!
X