News Flash

‘बुगी वुगी’मधून जिंकलेल्या ५ लाखांमधून फेडलं वडिलांवरचं कर्ज; धर्मेशने सांगितली संघर्षाची कहाणी

"वडील चहाची टपरी चालवत होते...त्यांच्याकडून घरखर्चाचा भार उचलला जात नव्हता...वडिलांवर खूप कर्ज झालं होतं...आणि...."

धर्मेश येलांडे हे नाव आज संपूर्ण देशाला परिचीत आहे. धर्मेश येलांडेपेक्षाही ‘धर्मेश सर’ या नावाने त्याला अधिक ओळखलं जातं. ‘डान्स इंडिया डान्स’पासून धर्मेश हे नाव घराघरात पोहोचलं आणि तिथूनच सुरु झाला धर्मेशच्या यशाचा प्रवास. धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर असला तरी त्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला आहे. पण तुम्हाला माहितेय का, धर्मेशने यापूर्वी ९० च्या दशकातला सुप्रसिद्ध ‘बुगी वुगी’ शोमध्ये भाग घेतला होता. सोनी टीव्हीवर झालेल्या ‘बुगी वुगी’ या शोमधून त्याने जिंकलेल्या ५ लाखांमधून वडिलांच्या डोक्यावरचं कर्ज फेडलं होतं.

९० च्या दशकात सोनी टीव्हीवरील ‘बुगी वुगी’ या टॉप रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षण करणारे जावेद जाफरी आणि नावेद जाफरी हे दोघेही येत्या आठवड्यात ‘डान्स दिवाने ३’ मध्ये दिसणार आहेत. नुकतंच कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘डान्स दिवाने ३’ शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. हा प्रोमो शेअर करताना कलर्स टीव्हीने एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्यांनी लिहिलंय, “धर्मेशने सांगितली त्याच्या डान्स दिवानगीची कहाणी…पहा डान्स दिवाने ३ मध्ये…शनिवार-रविवार रात्री ९ वाजता, फक्त कलर्स टीव्हीवर !”.

या प्रोमोमध्ये धर्मेश येलांडे जावेद जाफरी आणि नावेद जाफरी यांना संघर्षाची कहाणी ऐकवताना दिसतोय. यात धर्मेश म्हणतो, “ज्यावेळी मी तुमच्या शोमध्ये पहिलं पाऊल टाकलं होतं, तो माझा यशाच्या मार्गाचा पहिला दरवाजा होता. वडील चहाची टपरी चालवत होते…त्यांच्याकडून घरखर्चाचा भार उचलला जात नव्हता…वडिलांवर खूप कर्ज झालं होतं…आणि त्यावेळेला मी डान्सच्या व्यतिरिक्त काहीच करत नव्हतो. त्यावेळेला मी तुमच्या शोमधून ५ लाख रूपये जिंकलो होतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

धर्मेशची कहाणी ऐकल्यानंतर जावेदने त्याचं कौतुक केलं. “त्यावेळी लहानश्या वयात जबाबदारीचं भान, तु जे आता इथपर्यंत पोहोचलास ते तुझ्या वडिलांच्या आशिर्वादामुळेच…”, असं त्यावेळी जावेद म्हणाला.

कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दिवाने ३’ च्या यंदाच्या एपिसोडमध्ये वाईल्ड कार्ड कंटेस्टंट्सचा परफॉर्मन्स देखील पहायला मिळणार आहे. हे स्पर्धक शोच्या टॉप ८ मधील स्पर्धकांना तगडी टक्कर देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 4:44 pm

Web Title: dharmesh recalls how winning rs 5 lakh on boogie woogie helped his debt ridden family prp 93
Next Stories
1 ‘बायको अशी हव्वी’ आणि ‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेत विवाह विशेष सप्ताह !
2 सलमान, अक्षय नंतर आता केआरकेचा विद्या बालनशी पंगा, म्हणाला..
3 मलाही इथे सेल्फी काढायची आहे…!; सोनू सूदने व्यक्त केली मनातली इच्छा
Just Now!
X