मोठ्या मोठ्या कार्यक्रमात, उद्योगपती यांच्या घरात असलेल्या लग्न समारंभात वगैरे बॉलिवूड कलाकार परफॉर्म करताना दिसतात. कधी कोणत्या बॉलिवूड कलाकाराला शोकसभेत येण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली असे तुम्ही कधी ऐकले का? मात्र, अशी ऑफर ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेला ५ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. एका मुलाखती दरम्यान त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला.

२००९ साली चंकी पांडे यांना मुलुंडमधील एका उद्योगपती कुटुंबाने वारसाच्या अंत्यसंस्कारात सामील होण्यासाठी विनंती केली. याचं कारण देखील त्यांने सांगितलं आहे. “त्या कुटुंबाने ही गोष्ट फक्त प्रसिद्धीसाठी केली. कुटुंबाने चित्रपटांमध्ये गुंतवणूक केली आहे. असं त्यांना जमलेल्या लोकांना भासवून द्यायचं होतं. त्यामुळे त्यांना कर्ज परतफेड करावी लागणार नाही. हे ऐकल्यानंतर मी चकित झालो. मी जागीचं बेशुद्ध पडलो,” असे चंकी पांडे म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chunky Panday (@chunkypanday)

पुढे तो म्हणाला, “मला त्याठिकाणी रडायचं होतं. संपूर्ण कार्य होईपर्यंत मला एका कोपऱ्यात उभं राहाचं. कारण कर्ज देणाऱ्यांना असं वाटायला हवं की, ते कुटुंब काही अभिनेत्यांसोबत मिळून चित्रपट करत आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने मला ५ लाखांची ऑफर देखील दिली. पण मी त्यांना नकार दिला आणि माझ्या जागी दुसऱ्या कोणाला पाठवलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chunky Panday (@chunkypanday)

चंकी पांडेने शोकसभेला कोणाला पाठवलं हे सांगितलं नाही. “एका जागी उभं राहाण्यासाठी ५ लाख प्रचंड मोठी ऑफर आहे. मला अभिनय करायचं आहे. पण फक्त चित्रपटांमध्ये कोणत्याही शोकसभेत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Chunky Panday (@chunkypanday)

चंकी पांडेने १९८८ मध्ये ‘पाप की दुनिया’ आणि ‘खतरों के खिलाडी’, १९९० मध्ये ‘जहरीले’,१९९२ मध्ये ‘आंखे’ सारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. १९८८ च्या लोकप्रिय ‘तेजाब’ सिनेमांत अनिल कपूरच्या मित्राची भूमिका साकारली. ज्या भूमिकेसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. पण अगदीच ९० च्या दशकात त्यांच करिअर संपलं.