News Flash

नयनताराने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार?

'चेन्नई एक्स्प्रेस' हा चित्रपट तुफान हिट ठरला होता.

नयनताराने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये शाहरुखसोबत काम करण्यास दिला होता नकार?

अॅक्शन, रोमान्स, ड्रामाने परिपूर्ण असा मसालापट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओळखला जातो. बॉक्स ऑफिसवर हिटचा फॉर्म्युला रोहितला अचूक ठाऊक आहे असं म्हटलं जातं. त्याच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. अभिनेता शाहरुख खान व दीपिका पदुकोण यांची जोडी चाहत्यांना खूप आवडली. पण तुम्हाला माहितीये का, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सर्वांत जास्त मानधन घेणारी अभिनेत्री नयनतारा हिलासुद्धा चित्रपटात भूमिका साकारण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र तिने चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

नयनताराला चित्रपटात दीपिकाच्या भूमिकेसाठी नव्हे तर ‘वन टू थ्री फोर’ या गाण्यासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र तिने त्यास नकार दिला. या नकारामागचं कारण मात्र अस्पष्ट आहे. त्यामुळे अभिनेत्री प्रियामणीला या गाण्यासाठी विचारण्यात आलं. दाक्षिणात्य संगीत आणि शब्दांचा फ्युजन असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आताही पार्ट्यांमध्ये नाचताना हे गाणं हमखास लावलं जातं.

रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात सत्यराज, निकितिन, धीर आणि कामिनी कौशल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. आजही या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 5:44 pm

Web Title: did you know that nayanthara refused to share screen space with shah rukh khan in chennai express ssv 92
Next Stories
1 “बॉलिवूडमध्ये बाहेरुन येणाऱ्यांची एवढी चिंता आहे तर…”; स्वराचा सल्ला
2 Video : कुणाल खेमूच्या आगामी ‘लुटकेस’चा ट्रेलर प्रदर्शित
3 ‘या’ कारणासाठी सुशांतच्या बहिणीची पुन्हा एकदा होणार पोलीस चौकशी
Just Now!
X