News Flash

मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर दिशाने पहिल्यांदा केली पोस्ट

दिशाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर फिरत असल्याने दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती.

(Photo Credit : Disha Patani Instagram Image)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी आणि अभिनेता टायगर श्रॉफ बऱ्याचवेळा एकत्र दिसतात. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. मंगळवारी दुपारी ३ वाजता टायगर आणि दिशा वांद्रे परिसरात बॅंडस्टॅंड या परिसरात फेरी मारताना दिसले. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्यांना अडवले होते. करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. कारवाई झाल्यानंतर दिशा पटानीने पहिल्यांदा एक पोस्ट शेअर केली आहे.

दिशान तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दिशा समुद्रात असल्याचे दिसत आहे. दिशाने बिकिनी परिधान केली आहे. हा फोटो शेअर करताना दिशाला सुट्ट्यांची आठवण येत असल्याचे दिसतं आहे. दिशाच्या या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. हा फोटो शेअर करत दिशाने ‘थ्रोबॅक’ हे कॅप्शनही दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

हा फोटो पाहताच दिशाच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव करत तिची स्तुती केली आहे. एक नेटकरी म्हणाला, “फोटो उत्तम आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “सौंदर्याचे प्रतिक.” तिसरा नेटकरी म्हणाला, “तू सुंदर आहेस.” दिशाच्या या फोटोला १२ लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे.

आणखी वाचा : सलमान आणि केआरकेच्या भांडणात गोविंदाला खेचले, संतप्त प्रतिक्रिया देत म्हणाला…

करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे दिशा आणि टायगरवर कारवाई करण्यात आली होती. टायगर आणि दिशाला पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या वेळी त्यांच्या विरोधात आयपीएस (भादंवि) कलम १८८, कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा : “एवढ्या शिक्षणाचा काय फायदा?”, हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल

दरम्यान, दिशाचा ‘राधे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. यानंतर दिशा ‘एक व्हिलन २’ या चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे टायगर ‘हीरोपंती २’, ‘बागी ४’ आणि ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 5:56 pm

Web Title: disha patani posted a photo on instagram after getting booked by mumbai police dcp 98
Next Stories
1 Koo अ‍ॅपवर अनुपम खेर यांचे १ मिलियन फॉलोअर्स; बॉलिवूड बाहेरही कडक रेकॉर्ड
2 “एवढ्या शिक्षणाचा काय फायदा?”, हिजाब घातल्याने सना खान झाली ट्रोल
3 कॅन्सरचं निदान झाल्यानंतर किरण खेर यांची पहिली झलक, मुलाला म्हणाल्या ‘लग्न कर’
Just Now!
X