28 May 2020

News Flash

ओळखलंत का या मराठमोळ्या अभिनेत्याला? बॉलिवूडमध्ये कमावलं मोठं नाव

मराठी प्रमाणेच बॉलिवूडमध्येही या अभिनेत्याने आपल्या अभिनयाची 'लय भारी' छाप सोडली आहे.

रितेश देशमुख

लहानपणीच्या या फोटोवरून अभिनेत्याला ओळखणं तसं थोडं कठीणंच आहे. मराठी प्रमाणेच बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची ‘लय भारी’ छाप सोडणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखच्या बालपणीचा हा फोटो आहे. रितेश आता जितका हँडसम दिसतो, तितकाच तो बालपणी ‘गोंडस’ होता. त्याचा हा फोटो पाहून तुमच्याही तोंडून ‘क्यूट’ हा शब्द नक्की बाहेर पडेल.

हिंदीतल्या अनेक बड्या कलाकारांशी मैत्री असलेल्या रितेशची मराठी कलाकारांसोबतही चांगली गट्टी आहे. आतापर्यंत अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांची निर्मिती करत रितेशनं मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

आणखी वाचा : हृतिकसोबतच्या या मुलाला ओळखलं का?

२०१२ मध्ये रितेश आणि जेनेलिया विवाहबद्ध झाले होते. त्याआधी जवळपास ८ वर्षे हे दोघं एकमेकांना डेट करत होते. जेनेलियासुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय होती. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनीही २००३ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नाला सात वर्षे होऊनही त्यांच्या नात्यामध्ये प्रेमाचा गोडवा अजूनही टिकून आहे. रितेश- जेनेलिया ‘तुझे मेरी कसम’, ‘मस्ती’ आणि ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या चित्रपटांमधून पडद्यावर एकत्र दिसले. लग्नानंतर जेनेलियाने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला आणि कुटुंबाला प्राधान्य दिलं. जेनेलिया सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरीही काही कार्यक्रमांना ती रितेशसोबत आवर्जुन हजेरी लावते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 11:29 am

Web Title: do you recognize this marathi actor who is also star in bollywood ssv 92
Next Stories
1 Photo : सौमित्रच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
2 बॉलिवूड कलाकारांची पंतप्रधान मोदींसोबत ‘मन की बात’
3 चित्रपटांची दिवाळी
Just Now!
X