10 July 2020

News Flash

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? खुद्द अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर

खरंच 'स्वराज्यरक्षक संभाजी'चा शेवट बदलणार का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. ही विनंती डॉ. अमोल कोल्हे यांनी स्विकारली अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

“गेली दोन वर्षे मालिका सुरू आहे. जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल!” अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

अर्जुन खोतकर यांनी शेवटचे भाग वगळण्याची विनंती का केली?

मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता यानंतरची दृश्यं पाहाणं मनाला पटणारी नाहीत त्यामुळे ती दृश्य वगळण्याची विनंती त्यांनी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2020 1:36 pm

Web Title: dr amol kolhe said swarajya rakshak sambhajis end will never change mppg 94
Next Stories
1 ‘कुछ तो गड़बड़ है…’ म्हणणाऱ्या दया, फ्रेड्री आणि अभिजीतचीच फसवणूक
2 क्रिती खरबंदाचं सामान गेलं चोरीस; एअर इंडिया म्हणालं…
3 डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती; म्हणाले…
Just Now!
X