21 October 2020

News Flash

#MeToo : सुहेल सेठवरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप

एका महिलेने त्यांच्यावर ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असल्याचा आरोप केला आहे.

Suhel Seth at the Express Adda with Nobel laureate Amartya Sen on 29th Dec. 2014.Express Photo by Renuka Puri.

भारतातील ‘मी टू’ मोहिमेच्या वावटळीत विकास बहल, चेतन भगत, अलोकनाथ, वरुण ग्रोव्हर यांच्यानंतर प्रख्यात लेखक सुहेल सेठ हेही सापडले आहेत. सुहेल सेठ यांच्यावरही लैंगिक गैरवर्तन आणि छळाचे आरोप करण्यात आले आहेत
ऑगस्ट २०१० मध्ये घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून, एका महिलेने त्यांच्यावर ‘लाळघोटय़ा’ (क्रीप) असल्याचा आरोप केला आहे. आपण १७ वर्षांच्या असताना सेठ यांची ‘फॅन’ म्हणून ट्विटरवर त्यांना फॉलो करीत होतो. मात्र एकदा त्यांनी संदेश पाठवून त्यांच्यासोबत मद्यपान करण्याचे आमंत्रण दिले, तसेच आपल्याला लज्जा वाटेल असाही संदेश आपल्याला पाठवला, अशी कहाणी या अनामिक महिलेने अनिशा शर्मा यांच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केली आहे. सेठ यांनी मात्र हा आरोप नाकारला असून, त्यावेळी आपण परदेशात होतो असे म्हटले आहे.

 

 

 

दरम्यान, तनुश्री दत्ता, विनिता नंदा आणि संध्या मृदुल यांच्यापाठोपाठ बुधवारी आणखी एका महिलेने ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला, तर तमिळ गीतकार वैरामुथु यांच्यावर गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी लैंगिक छळाचा आरोप केला. चंदेरी दुनियेतील निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांनी लैंगिक छळ किंवा लैंगिक गैरवर्तवणूक केल्याच्या तक्रारी करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक महिला पुढे आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 9:41 am

Web Title: filmmaker accuses suhel seth of sexual assault
टॅग MeToo
Next Stories
1 रामपालचा आज निर्णय; जमावबंदी लागू, २ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 पेट्रोल, डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे दर
Just Now!
X