News Flash

‘फितूर’मध्ये रेखाऐवजी तब्बूची निवड

चार्ल्स डिकन्सच्या 'ग्रेट एक्सपेक्टेशन' या कादंबरीवर आधारीत 'फितूर' या चित्रपटामधून ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची निवड रद्द करण्यात आली असून आता त्याऐवजी तब्बूची निवड करण्यात आली

| May 27, 2015 02:18 am

‘फितूर’मध्ये रेखाऐवजी तब्बूची निवड

चार्ल्स डिकन्सच्या ‘ग्रेट एक्सपेक्टेशन’ या कादंबरीवर आधारीत ‘फितूर’ या चित्रपटामधून ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांची निवड रद्द करण्यात आली असून आता त्याऐवजी तब्बूची निवड करण्यात आली आहे.
चित्रीकरण झालेल्या काही दृष्यांबद्दल रेखा नाराज होत्या आणि त्यांचे पुन्हा चित्रीकरण करण्यात यावे, अशी त्यांची अपेक्षा होती. रेखा यांची निवड रद्द झाल्याने त्यांच्या फॅन्समध्ये नाराजीचे वातावरण असणे साहजिक आहे. रेखा या चित्रपटामध्ये ग्रेट एक्सपेक्टेशन या कादंबरीमधील ‘मिस हवीशम’ हे पात्र साकारणार होत्या. आता अभिनेत्री तब्बू ‘मिस हवीशम’ हे पात्र साकारताना दिसेल. अलिकडेच चांगले यश प्राप्त केलेल्या ‘हैदर’ या चित्रपटात तब्बूने काम केले होते. ‘फितूर’चे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत असून ज्येष्ठ चित्रपट समीक्षक राजीव मसंद यांनी अलिकडेच ट्विटरवर ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2015 2:18 am

Web Title: fitoor update rekha out tabu in
टॅग : Rekha
Next Stories
1 पाहा – ‘सिंग ईज ब्लिंग’ चित्रपटाचा फर्स्ट लुक
2 ‘पिलंट्र’च्या चित्रीकरणाला गणेश टेकडी मंदिरातून प्रारंभ
3 मॉडेलिंग क्षेत्रातील वास्तव
Just Now!
X