News Flash

फ्रेडा पिंन्टो आणि नर्गिस फाखरीची ‘कॉफी विथ करण’ मध्ये धमाल मस्ती

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोची हळूहळू चर्चा वाढत आहे. या शोच्या ४ थ्या पर्वाची सुरूवात सलमान खानबरोबरच्या करणच्या बहुचर्चित गप्पांनी झाली.

| December 3, 2013 08:35 am

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोची हळूहळू चर्चा वाढत आहे. या शोच्या ४ थ्या पर्वाची सुरूवात सलमान खानबरोबर करणच्या बहुचर्चित गप्पांनी झाली. आता करणने त्याच्या गेस्ट-लिस्टमधील दोन नवीन अभिनेत्रींची नावे प्रसिध्द केली आहेत. ‘मद्रास कॅफे’ची हिरोइन नर्गिस फाखरी आणि हॉलिवूड दिवा फ्रेडा पिंन्टोने नुकतेच या शोसाठीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. करणने या दोघींचे शोमधील छायाचित्र संदेशासह िट्वटरवर पोस्ट केले आहे. तो म्हणतो – फ्रेडा पिंन्टो आणि नर्गिस फाखरी या मस्तीखोर मुलींबरोबरचा सर्वात ऐतिहासिक कॉफी एपिसोड नुकताच शूट केला!!!
‘कॉफि विथ करण’ शोमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी धमाल मस्ती केली. या स्टायलिश अभिनेत्रींचा डोक्यावर कॉफी कप ठेवलेला काऊचवरचा फोटो करणने िट्वट केला आहे. १ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या शोच्या पुढील भागात करिना कपूर आणि रणबीर हे बहिण-भाऊ दिसणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 8:35 am

Web Title: freida pinto nargis fakhri get naughty on koffee with karan
Next Stories
1 शाहरूखच्या दुबईतील ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये चाहत्यांचा गोंधळ
2 ‘केबीसी’ ऑनलाइनअवतार लोकप्रिय!
3 ‘वेलकम बॅक’साठी दुबईतली रॉयल नौका