News Flash

‘भिकारी’ सिनेमाच्या सुपरसाँगचे चित्रिकरण पूर्ण

तब्बल एक हजार कलावंतांचा सहभाग

'स्वामी तिन्ही जगाचा... भिकारी' सिनेमातील गाण्याचे चित्रिकरण पूर्ण

‘बाजीराव मस्तानी’तले मल्हारी असो किंवा ‘अग्निपथ’मधले चिकनी चमेली हे गाणे अशा अनेक गाजलेल्या गाण्यांसाठी नृत्य दिग्दर्शन केलेला गणेश आचार्य तसा सर्वांच्या परिचयाचा असेल. गणेश आचार्य आणि भव्यता हे समीकरणच आहे. आता हिंदी चित्रपटांत असलेली भव्यता घेऊन गणेश आचार्य मराठी चित्रपटसृष्टीत आला आहे. त्यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ या पहिल्या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत सुरू झाले आहे. या चित्रपटात तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेल्या गणपती बाप्पावरील गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले. आतापर्यंत मराठी चित्रपटांत चित्रीत झालेल्या गाण्यांमध्ये हे ‘सुपरसाँग’ ठरणार आहे.

मी मराठा एंटरटेन्मेंटच्या शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा मुहुर्त झाला होता. मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रपटाचं चित्रीकरण नुकतेच सुरू झाले असून अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री ऋचा इनामदार, गुरू ठाकूर आणि कीर्ती आडारकर यांच्यावर ‘देवा हो देवा’ हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. सुखविंदरसिंग यांनी गायलेले हे गाणे मिलिंद वानखेडे आणि विशाल मिश्रा यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात एकूण सहा गाणी आहेत. राहुल ठोंबरे आणि संजीव होवाळदार यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक गणेश आचार्यही नेहमीच्या शैलीत गाण्यात दिसणार आहेत. तीन दिवस या गाण्याचे चित्रीकरण सुरू होते.

bhikari-new

swapnil-bhikari

‘गजानना’ या गाण्याच्या चित्रीकरणाचा तामझाम कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला लाजवेल इतका भव्य होता. खास या गाण्यासाठी चाळीस फूट उंचीचा सेट उभारण्यात आला. गणपती बाप्पांची ३५ फुटी मुर्ती ठेवण्यात आली होती. तब्बल एक हजार कलाकारांचा या गाण्यात सहभाग होता. सेटवर ढोलताशा, झांजांचा गजर होत होता. तसंच सतारही वाजवली जात होती. या चित्रीकरणावेळी वातावरण रंगीबेरंगी होऊन गेले होते. तब्बल २५० मोठ्या घंटा या गाण्याच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आल्या आहेत. येत्या गणेशोत्सवात हे गाणे गाजणार हे नक्कीच आहे. या चित्रपटाची निर्मितीमूल्य पाहता, ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा २०१७ मधील बिगबजेट आणि बहुचर्चित चित्रपट ठरणार यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 8:36 pm

Web Title: ganesh acharya directed swapnil joshis upcoming movie swami tinhi jagacha bhikaris song shoot completed
Next Stories
1 स्कार्लेट जोहानसन बनली या वर्षातली सर्वात जास्त कमाई करणारी अभिनेत्री
2 ऋषी कपूरने जॉन्टी रोड्सच्या मुलीशी केली करिनाच्या मुलाची तुलना
3 कपिल शर्माच्या घरात तिचे पुनरागमन
Just Now!
X