अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतंच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या मुलासोबतचे भन्नाट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत गश्मीर आणि त्याचा मुलगा दोघेही फारच गोंडस दिसत आहेत. पण काही जणांना मात्र त्यांचे हे फोटो आवडलेले दिसत नाहीत. अनेकांनी या फोटोबद्दल आक्षेप घेतला आहे. असं काय आहे या फोटोंमध्ये, का वाटले आक्षेपार्ह…चला जाणून घेऊया.

अभिनेता गश्मीर महाजनीने नुकतेच आपल्या मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. यात गश्मीर आणि त्याचा मुलगा दोघांनीही पांढरं धोतरं नेसलं आहे. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. गश्मीरचा दोन वर्षांचा मुलगा व्योम याचं टक्कल केलेलं असून एक शेंडी मात्र दिसत आहे. एका फोटोत गश्मीर ही शेंडी ओढताना दिसत आहे. यावरुनच अनेकांना आक्षेप असल्याचं दिसून आलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.

Nariyal paani anyone???

Posted by Gashmeer Mahajani on Sunday, April 11, 2021

अनेकांनी या फोटोचा संबंध मुंज या धार्मिक विधीशी जोडला आहे. अनेकांना वाटत आहे की, गश्मीरच्या मुलाची मुंज झाली आहे. त्याने त्याची शेंडी ओढताना काढलेला फोटो हा धर्माचा अपमान होईल असा असल्याचा अनेकांचा आक्षेप दिसून आला. यातल्या एका कमेंटला उत्तर देताना गश्मीरने याबाबत स्पष्टीकरणही दिलं आहे.

या कमेंटला उत्तर देताना तो म्हणतो, “मुळात ही त्याची शेंडी नाही. तो फक्त दोन वर्षांचा आहे. मुंज झालेली नाही. उन्हाळा म्हणून केस कापले आहेत. बापाला आपल्या मुलाची शेंडी ओढण्याचा पूर्ण अधिकार असतो. पण आपण बहुतेक आपल्या धर्माचे शिलेदार आहात. पूर्ण माहिती नसताना बेजबाबदार कमेंट करु नका.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्यावर टीका करणाऱ्यांना त्याने सडेतोड भाषेत उत्तर दिलं आहे. अनेकांनी त्याच्या या उत्तराचं कौतुकही केलं आहे. तसंच त्याला पाठिंबा दिला आहे. अनेकांना गश्मीर आणि त्याच्या मुलाचा हा फोटो प्रचंड आवडलेला दिसत आहे.

गश्मीर लवकरच प्रेक्षकांना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.