News Flash

ओळखा पाहू या चिमुकलीला; आता आहे मराठीतील आघाडीची अभिनेत्री

सध्या 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत साकारतेय भूमिका

ओळखलंत का या चिमुकलीला? आता ती मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ही अभिनेत्री आहे ‘झेंडा’, ‘शर्यत’, ‘ती सध्या काय करते’ यांसारख्या अनेक चित्रपटांमधून आपल्या भूमिका पार पाडलेली आणि विशेषत: ‘होणार सून मी या घरची’ असं म्हणत मालिकेतून सहा सासवांसोबत आपल्या कुटुंबाला हसत खेळत पुढे घेऊन जाणारी जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान.

तेजश्री सध्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत एका विवाहित महिलेची भूमिका साकारत आहे. शुभ्रा असं तिच्या भूमिकेचं नाव असून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. ‘होणार सून मी या घरची’ ही मालिका संपल्यानंतर छोट्या पडद्यावर तेजश्रीचे दर्शन रसिकांना घडले नाही. त्यामुळे रसिक तिला पाहण्यासाठी आतुर होते. ब्रेकनंतर तिने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

आणखी वाचा : राणा डग्गुबतीला डेट करतेय ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री?

तेजश्रीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांतून आपल्या सृजनशील अभिनयाची ओळख पटवून दिली आहे. डोंबिवलीत राहणाऱ्या तेजश्रीने ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून पदार्पण केलं. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 5:49 pm

Web Title: guess this childhood photo of a leading marathi actress who is working in aggabai sasubai serial ssv 92
Next Stories
1 ”बिग बींनी माफी मागावी”; ‘केबीसी ११’मध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख
2 ‘हिरकणी’नंतर सोनाली कुलकर्णी दिसणार अनोख्या भूमिकेत
3 ‘पानिपत’वरुन राजदूतांना भारत-अफगाणिस्तान संबंधाची चिंता
Just Now!
X