News Flash

Video : बिग बी-आयुषमानमध्ये ‘जूतम फेंक’; गुलाबो सिताबोचं पहिलं गाणं प्रदर्शित

पाहा, घरमालक-भाडेकरु यांचं दंग करणारं भांडण

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि आयुषमान खुराना यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुलाबो सिताबो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमधून बिग बी आणि आयुषमान खुराना यांची जोडी मजेशीर अंदाजात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रत्येकाला उत्सुकता आहे. त्यातच चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘गुलाबो सिताबो’च्या भन्नाट ट्रेलरनंतर हे नवीन गाणं प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली आहे. ‘जूतम फेंक’ असे या गाण्याचे बोल असून यात बिग बी आणि आयुषमान यांच्यातील भांडणाचे मजेशीर खटके दाखविण्यात आले आहेत.

दरम्यान,शुजीत सरकार दिग्दर्शित याचित्रपटातलं ‘जूतम फेंक’ हे गाणं पीयूष मिश्रा यांनी गायलं आहे. तर पुनीत शर्मा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. या चित्रपटात बिग बी ‘मिर्झा’ ही भूमिका साकारत असून ते घरमालक आहेत. तर ‘बांके’ म्हणजे आयुषमान खुराना त्यांचा भाडेकरु दाखविला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 4:09 pm

Web Title: gulabo sitabo first song jootam phenk out ssj 93
Next Stories
1 बिग बी म्हणतात, “बाहुबलीपेक्षाही माझ्या ‘या’ चित्रपटाने केली होती जास्त कमाई”
2 अब्बा किंवा पप्पा नाही, तैमुर सैफला ‘या’ नावाने मारतो हाक
3 श्री-जान्हवी पुन्हा येतायत प्रेक्षकांच्या भेटीला; ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेचं पुनःप्रक्षेपण
Just Now!
X