भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मराठी कलाकारांची खिल्ली उडवत केलेल्या ट्विटमुळे ते सध्या चर्चेत आहेत. आता त्यांच्या या ट्विटवरर अभिनेता हेमंत ढोमेने वक्तव्य केले आहे.

हेमंतने ट्विटमध्ये ‘जे कष्ट करतात… छोट्या गावातुन येऊन मोठी स्वप्नं बघतात… स्वत:ला सिद्ध करतात… अशा लोकांना आपण काहीही बोलण्याची आपली पात्रता आहे का? बरं ते जाऊद्या, मला माहित नाही पण ते सतरंज्या उचलणारे कोण असतात? ही नेमकी काय भानगड आहे?’ असे म्हणत अप्रत्यक्षपणे अवधूत वाघ यांना प्रश्न विचारला आहे.

आणखी वाचा : मराठी कलाकारांची खिल्ली उडवल्याने भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ झाले ट्रोल

काय होते अवधूत वाघ यांचे ट्विट?

स्कूटी घेतली की सेल्फी काढतात आणि डोंबिवली चर्चगेटचा फर्स्ट क्लासचा पास स्टेटस ठेवतात असे म्हटले आहे.

वाघ यांनी रिप्लाय दिलेलं ट्विट नेमकं काय होते?

एका यूजरने ट्विटरवर कंगनाचे मानधन आणि मराठी कलाकारांचे मानधन अधोरेखीत केले होते. “इथे कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न नाहीये. पण आज ज्या पद्धतीने मराठी नट्या कंगनावर तुटून पडल्यात आणि तिला तिची लायकी सांगतायत… सर्वांच्या माहितीसाठी.. कंगनाची फी-११ कोटी (मुव्हीसाठी)\ १.५ कोटी (अॅडसाठी), मराठी नट्या- २.५ ते ५ लाख (मुव्हासाठी)\ ७.५ ते १०,००० रुपये पर डे सीरियलसाठी” असे ट्विटमध्ये म्हटले होते.