‘कहो ना प्यार है’, ‘गदर- एक प्रेम कथा’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री म्हणजे अमिषा पटेल. आज ९ जून रोजी अमिषाचा वाढदिवस. करिअरच्या सुरुवातीली अमिषा हिट ठरली होती. मात्र त्यानंतर ती विशेष कामगिरी करु शकली नाही. एकेकाळी तिला मिळालेली प्रसिद्धीही हळूहळू कमी होऊ लागली. सध्या ती बॉलिवूडच्या कोणत्याही विशेष प्रोजेक्टमध्ये झळकत नाहीये. पण तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने ती नेहमीच चर्चेत असते.
अमिषा बॉलिवूड पार्ट्यांना आवर्जून हजेरी लावते. या पार्ट्यांमध्ये तिच्यासोबत फोटो (सेल्फी) काढण्यासाठी ती सेलिब्रिटींच्या मागे लागते असंही म्हटले जाते. यामुळे सेलिब्रिटीसुद्धा तिला वैतागले आहेत. कपूर घराण्यात झालेल्या एका पार्टीदरम्यान अमिषाच्या कृत्यामुळे रणबीर कपूर ती पार्टी सोडून गेल्याची चर्चा होती.
आणखी वाचा : ‘तू तुझ्या वयाच्या अभिनेत्रींसोबत कधी काम करणार?’ सोफियाने सलमानला केला सवाल
View this post on Instagram
‘डेक्कन क्रॉनिकल’च्या वृत्तानुसार अमिषाला रणबीरसोबत खासगीत चर्चा करायची होती. त्यासाठी ती सारखं रणबीरला विचारत होती. तिला नेमकं काय बोलायचं आहे हेच न समजल्याने आणि तिच्यापासून थोडं लांबच राहिलेलं बरं या अनुषंगाने रणबीर थेट पार्टीतून निघून गेला. रणधीर कपूर यांच्या सत्तराव्या वाढदिवासाच्या पार्टीमध्येही असाच काहीसा किस्सा झाला होता. त्यावेळी पार्टीमधील रणबीर आणि अमिषाचे फोटोदेखील व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर दोघांच्या लिंक- अपच्याही चर्चा होऊ लागल्या होत्या. त्यानंतर रणबीर अमिषापासून दोन हात लांबच राहणं पसंत करू लागला.