News Flash

प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड ‘भारत’साठी योग्य होती कारण…..

प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड करणं हा सर्वात योग्य निर्णय होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

कतरिना कैफ

प्रियांका चोप्रानं ‘भारत’ला तडकाफडकी सोडचिठ्ठी देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रियांकाच्या निर्णयानं निर्माते, सलमान आणि चाहतेही नाराज झाले. प्रियांका चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर भारतसाठी कतरिनाची वर्णी लागली. खरं तर कतरिनाचंच नाव भारतसाठी सलमाननं पूर्वीच सुचवलं होतं. मात्र काही कारणानं हे समिकरण तेव्हा काही जुळून आलं नाही. मात्र आता प्रियांकाऐवजी कतरिनाचीच निवड करणं हा सर्वात योग्य निर्णय होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.

सलमान आणि प्रियांका दोघंही बॉलिवूडमधले आघाडीचे कलाकार. मात्र या दोघांची ऑनस्क्रिन जोडी बॉलिवूडमधली फ्लॉप जोडी म्हणून मानली जाते. प्रियांका सलमान खाननं ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘सलाम- ए- इश्क’ आणि ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातून काम केलं. मात्र यात ‘मुझसे शादी करोगी’ सोडला तर बाकी दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. प्रियांका- सलमानची जोडीदेखील चाहत्यांना फारशी आवडली नाही.

तर दुसरीकडे कतरिनासोबत सलमाननं अनेक चित्रपट केले. ते बॉक्स ऑफिसवर चांगलेलच चालले. विशेष म्हणजे सलमान कतरिना ही जोडी अल्पावधितच चाहत्यांची आवडती जोडी ठरली. सलमान कतरिनानं काम केलेल ‘मैने प्यार क्यु किया’, ‘पार्टनर’, ‘एक था टायगर’, ‘टायगर झिंदा है’ चित्रपट ब्लाकबस्टर चित्रपट ठरले. त्यामुळे चाहत्यांचा कौल लक्षात घेता सलमानची निवड ही योग्यच ठरणार आहे. या जोडीमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर  बक्कळ कमाई करेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 10:19 am

Web Title: here why katrina kaif is best choice for bharat
Next Stories
1 ‘ललित २०५’मधून घेतला जाणार नात्यांमधील हरवलेल्या संवादाचा शोध
2 ‘तू चिडला आहेस का, श्रीदेवीचे अखेरचे शब्द आजही आठवतात’
3 सोशल मीडिया ट्रोलर्सना सुहानाचं संयमी उत्तर, म्हणे…
Just Now!
X