छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन होऊन आता काही दिवसांनी एक महिना पूर्ण होईल. परंतू हिना खान या धक्क्यातून अजुनही सावरलेली नाही. तिच्या वडिलांसाठी डोळ्यात अश्रु येणं थांबत नाही. जेव्हा तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी तिला समजली तेव्ही ती तिच्या एका प्रोजेक्टच्या शूटसाठी काश्मिरला होती. वडिलांच्या निधनानंतर जेव्हा ती मुंबईत परतली तेव्हा ती कोरोना पॉझिटिव्ह आली होती. त्यामूळे गेले काही दिवस ती होम क्वारंटाइनमध्ये होती. त्यानंतर आता तिने मनातल्या गोष्टी खुलेपणाने व्यक्त केल्या आहेत.

एका माध्यमाशी बोलताना हिना खान म्हणाली, “माझ्या आयुष्यातून वडिलांचं जाणं याचा जितका जास्त विचार करतेय तितकाच जास्त त्रास होतोय…सध्या मला काहीच करायची इच्छा होत नाही…कोणासोबत बोलायची सुद्धा माझी इच्छा होत नाही…मला आणखी वेळ हवाय यातून बाहेर पडायला…काही अशीही कामं बाकी आहेत जी मी टाळू शकत नाही…बस्स…तीच कामं आटोपण्यात स्वतःला व्यस्त ठेवतेय….”.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

आपल्या वडिलांसारखाच नवरा हवाय….
यापुढे बोलताना अभिनेत्री हिना खान म्हणाली, “माझे आई-वडील एक बेस्ट कपल होते…मी लग्न संस्कारावर विश्वास ठेवते याचे कारणही माझे आई-वडीलच आहेत…मी अनेकदा त्यांच्या भांडणात सुद्धा एकमेकांसाठीचं प्रेम पाहीलं आहे…मी कायम देवाकडे एकच मागणं मागते, मला नवरा सुद्धा माझ्या वडिलांसारखाच मिळू देत…माझ्या वडिलांसारखाच तो ही प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असला पाहीजे…”

कदाचित चांगल्यासाठीच झालं असेल….
करोना पॉझिटिव्ह झाल्यानंतरचे दिवस आठवत हिना खान म्हणाली, “मी एकटीची होती आणि खूप घाबरली होती…माझे ह्रदयाचे ठोके ही वेगाने सुरू होते…पण आता मला असं वाटतंय, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं…वडिलांच्या निधनानंतर माझी आई निदान माझी काळजी घेण्यात व्यस्त राहिली आणि ती या दुःखातून थोड्या प्रमाणात का होईना बाहेर पडलीय…”

वडिलांच्या निधनानंतर लगेचच हिना खान करोना पॉझिटिव्ह आल्यानं ती आयसोलेशनमध्ये अडकून पडली होती. त्यामूळे या दुःखाच्या वेळी आईसोबत राहून तिला आधार देऊ शकली नाही, याची खंत देखील तिने यावेळी व्यक्त केली.