News Flash

ह्रतिकने शेअर केले अमिताभ यांच्यासोबतचे बालपणीचे छायाचित्र

ह्रतिकने अमिताभ यांच्याबरोबर 'कभी खुशी कभी गम'आणि 'लक्ष्य या चित्रपटांत एकत्र काम केले होते.

Hrithik Roshan & Amitabh Bachchan

अभिनेता ह्रतिक रोशन याने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे एक छायाचित्र ट्विटरवर शेअर केले आहे. हे छायाचित्र ह्रतिकच्या बालपणीचे असून यामध्ये तो  एका चित्रपटाच्या सेटवर अमिताभ यांच्यासोबत दिसत आहे. मी लहानपणी अमिताभ यांच्या खूप मोठा चाहता असल्याची आठवण ह्रतिकने छायाचित्रासोबतच्या संदेशात सांगितली आहे.


ह्रतिकने अमिताभ यांच्याबरोबर ‘कभी खुशी कभी गम’आणि ‘लक्ष्य या चित्रपटांत एकत्र काम केले होते. याशिवाय, ह्रतिकने नुकतेच आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. लवकरच तो ‘काबिल’च्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 1:22 pm

Web Title: hrithik roshan shares throwback pic with amitabh bachchan
Next Stories
1 आर. माधवनचा मुलगा गिरवणार बॉक्सिंगचे धडे!
2 ‘…तर सलमान खान शाहरूखचा स्टारपदाचा मुकूट हिरावून घेईल’
3 बाबांनी दिलेल्या आत्मशक्तीने बळ!
Just Now!
X