News Flash

माझ्या यशाचे श्रेय मी नशिबाला देत नाही – नावाझुद्दीन सिद्दिकी

नवाझमध्ये आपल्याला मांझी दिसल्याचे 'मांझी' चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये म्हटले. '

| August 19, 2015 03:08 am

नवाझमध्ये आपल्याला मांझी दिसल्याचे ‘मांझी’ चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता यांनी नुकतेच एका मुलाखतीमध्ये म्हटले. ‘मांझी’ चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत असून, मांझीच्या मुख्य भुमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे.
नवाझला त्याच्या यशाबद्दल विचारले असता, माझ्या यशाचे श्रेय मी नशिबाला देत नाही, असे त्याने सांगितले. मी गेली १५ वर्षे चित्रपटक्षेत्रात मेहनत घेत असून, इथपर्यंत पोहचण्यासाठी मला अथक परीश्रम करावे लागले आहेत. यश प्राप्तीनंतरदेखील माझे पाय जमीनीवरच रहाणार असल्याचे तो म्हणाला.
‘मांझी’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. बिहारमधील एका लहानश्या खेड्यात दशरथ मांझी हे आपल्या छोट्या कुटुंबासह रहात होते. त्यांच्या पत्नीला अपघात झाला असता तिला तातडीने शहरातील दवाखान्यात नेणे गरजेचे होते. दवाखान्याच्या वाटेवर असलेल्या डोंगरामुळे तिला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्याने तिचे प्राण वाचू शकले नाही. या दुर्दैवी घटनेचा राग मनात ठेवून मांझी यांनी तब्बल २२ वर्षे कुदळ व फावड्याच्या सहाय्याने डोंगर पोखरून शहराकडे जाण्याची वाट तयार केली. याच घटनेवर हा चित्रपट आधारीत असून, ‘व्हायकॉम १८’ व ‘एनएफडीसी इंडिया’ हा चित्रपट प्रदर्शित करत आहेत. दमदार कथानक आणि नवाझचा अभिनय या जमेच्या बाजू असलेला हा चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:08 am

Web Title: i dont want to give the credit of my success to luck nawazuddin siddiqui
टॅग : Nawazuddin Siddiqui
Next Stories
1 ‘चला हवा येऊ द्या’च्या आजच्या भागात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा जागर
2 बॉलीवूडच्या अभिनेत्री चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत!
3 ‘फोर्टी प्लस’ अन्नू कपूर दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर
Just Now!
X