इंडियन आयडल 12 च्या येणाऱ्या भागात सदाबहार अभिनेत्री रेखा यांची खास उपस्थिती पाहायला मिळणार आहे. रेखा यांच्यासोबत या एपिसोडमध्ये स्पर्धकांसोबत सर्वच परिक्षकांनीदेखील चांगलीच धमाल केली. मात्र या एपिसोडमध्ये रेखा यांच्या एका प्रतिक्रियेमुळे सगळेच थक्क झाले. या भागाच्या प्रोमोची एक क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
या प्रोमोमध्ये रेखा यांच्या एका प्रतिक्रियेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भागात सूत्रसंचालक जय याने जजेसना एक प्रश्न विचारला आहे. ” तुम्ही एखादी अशी महिला पाहिली आहे जी एका पुरुषांच्या प्रचंड प्रेमात आहे तेही विवाहित पुरुषाच्या?” जयचा प्रश्न संपताच रेखा यांनी “मला विचारा ना” अशी पटकन प्रतिक्रिया दिली. यावर जयने पुन्हा त्यांना काय म्हणालात असं विचारताच रेखां यांनी मिश्किल अंदाज मी “काहिच म्हणाले नाही” असं म्हणतं पुन्हा उत्तर देणं टाळलं.
View this post on Instagram
रेखा यांच्या या प्रतिक्रियेनंतर सेटवर एकच हशा पिकला. तर परिक्षकांनीदेखील रेखा यांच्या उत्तरावर टाळ्या वाजवल्या. यावर जयने क्या बात है म्हणत ” ये लगा सिक्सर” म्हणताच रेखाजी मात्र लाजल्याचं पाहायला मिळालं.
सोनाली कुलकर्णीचा ‘नो मेकअप’ लूक; चाहत्यांनी केलं कौतुक
याआधी रेखा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. या शोमध्ये रेखा यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे अनेक जण थक्क झाले. तर या शोच्या या खास भागामध्ये रेखा यांच्या सिनेमातील लोकप्रिय गाण्याची मैफल रंगणार आहे. सोबतच रेखा यांची अदाकारीदेखील पाहायला मिळेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2021 9:55 am