News Flash

आता २४ तास शास्त्रीय संगीत!

शास्त्रीय संगीताची आवड एखाद्या माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते या प्रश्नाचं उत्तर आहे, घरदार गहाण ठेवून स्वत:चं म्युझिक चॅनल काढण्यापर्यंत!

| August 20, 2013 07:37 am

दखल, सौजन्य –
शास्त्रीय संगीताची आवड एखाद्या माणसाला कुठंपर्यंत घेऊन जाऊ शकते या प्रश्नाचं उत्तर आहे, घरदार गहाण ठेवून स्वत:चं म्युझिक चॅनल काढण्यापर्यंत! रतीश तागडे यांच्या संगीतवेडातून १५ ऑगस्ट रोजी सुरू होत असलेलं हे शास्त्रीय संगीताला चोवीस तास वाहिलेलं देशातलं पहिलंवहिलं आणि अर्थातच एकमेव चॅनल आहे.
या देशातील पहिल्या पूर्णवेळ शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या इिन्सक या दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून तुमचा संगीताचा छंदच तुम्ही प्रत्यक्षात साकारत आहात. तेव्हा तुम्हाला लाभलेल्या संगीत पाश्र्वभूमीबद्दल काही सांगा..!
आम्ही मूळचे इंदोरचे. ग्वाल्हेर घराण्याचे बुंदू खॉं बिनकार यांच्याकडे माझे आजोबा गायकी शिकले. वडील, काका हेदेखील गायन, व्हायोलीन वादन करीत असत. काका प्रख्यात व्हायोलनिस्ट पं. व्ही. जी. जोग यांच्याकडे शिकले होते. घरातच संगीताचे वातावरण असल्यामुळे या क्षेत्रातील वझेबुवा, बखलेबुवा, पटवर्धनबुवा, हिराबाई बडोदेकर अशा थोर कलाकारांची ये-जा असे. साहजिकच, चांगलं ऐकणं होत गेलं. वयाच्या १६व्या वर्षांपर्यंत मी तबला वाजवीत असे. माझ्या वडिलांचं म्हणणं असं होतं की, कोणत्याही म्युझिशियनला तालाचं अंग अगदी पक्कं हवं. माझी बहीण ही कथ्थक डान्सर होती. बालकलाकार म्हणून आम्ही दोघे कार्यक्रम करीत असू. कधी तिच्या नृत्याला मी तबला साथ तर कधी माझ्या तबला वादनावेळी ती हार्मोनियम साथ करत असे. आमच्या एका कार्यक्रमाला किशन महाराज उपस्थित होते आणि माझं वादन ऐकल्यानंतर तर ते म्हणालेदेखील, ‘‘आज से ये बच्चा मेरा!’’ त्यांनी असं म्हटलं तरीही त्याकाळी मुलांना असं संगीत शिकण्यासाठी गुरूंकडे धाडणं, ही मराठी मानसिकता नव्हती. त्यामुळे ते राहून गेलं. त्यानंतर असाच चांगला योग प्रसिद्ध व्हायोलिन वादक एन. राजम यांच्याकडे शिकण्याचाही चालून आला, परंतु त्यावेळी माझे सीएस सुरू असल्याने तीही संधी हुकली. १७व्या वर्षांपासून वडील आणि काकांकडून व्हायोलिनचे धडे घेतले. गेली तीन दशके मी स्वतंत्र व्हायोलिन वादक तसेच सहवादक म्हणून तसेच याव्यतिरिक्त फ्युजन, जुगलबंदीचेही अनेक कार्यक्रम दिग्गजांसोबत केले आहेत. व्हायोलिनमध्ये मी तीनदा एम. ए. आणि गोल्ड मेडलिस्ट आहे, रेडिओचा बी हाय आर्टस्टि, सूरमणी पुरस्कारप्राप्त कलाकारही आहे. शिवाय कंपनी सेक्रेटरी आणि कायद्याचा पदवीधरही आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकरिता स्वतंत्र वाहिनी असावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून इथले नामवंत, ज्येष्ठ कलाकार केंद्र सरकारच्या प्रसारण मंत्रालयाकडे सातत्याने मागणी करत आहेत. या पाश्र्वभूमीवर तुम्हांला अशा स्वरूपाची वाहिनी सुरू करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
१९९३ साली मी मुंबईत आलो. नोकरी करत असतानाच व्हायोलिनची साथसंगत करत अनेक कॉन्सर्ट केल्या. असं करत असताना २००२ पासून इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून परफेक्ट ऑक्टेव्ह मिडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड ही माझी कंपनी सुरू केली. संगीत कार्यक्रमांचे आयोजन करीत असताना अनेक चोखंदळ प्रेक्षक कार्यक्रम, त्याची संकल्पना आवडल्याचे आवर्जून सांगत असत. त्याच वेळी असे कार्यक्रम दूरचित्रवाहिनीवर पाहता येत नसल्याची खंतही व्यक्त करीत. शास्त्रीय संगीताचा रसिक वर्ग वेगळा आहे, त्यामुळे अशांकडून या संगीताकरिता स्वतंत्र म्युझिक चॅनेल का अस्तित्वात येऊ शकत नाही, अशी वरचेवर विचारणा होत असे. यातूनच मनातील सुप्त विचारांना चालना मिळाली. डिजिटायझेशनमुळे आज प्रसारणाच्या कक्षा रुंदावलेल्या असल्या तरीही हे निश् चॅनेल असल्याने त्याचा प्रेक्षक वर्ग हा सध्यातरी मर्यादित स्वरूपाचा असणार, हे लक्षात घेऊन सर्वाना आवडेल अशी याची रचना करण्याचा विचार पुढे सुरू झाला. अनेक ज्येष्ठश्रेष्ठ कलावंतमंडळी यासाठी भरपूर प्रयत्न करीत होती. परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. मी जेव्हा माझ्या मनातील संकल्पनेविषयी त्यांच्याशी विचारविनिमय केला त्यावेळी त्या सर्वानी उत्स्फूर्तपणे सर्वतोपरी सहाय्य देण्याची तयारी दर्शवत मला पािठबा दिला. विशेष सांगायची बाब म्हणजे पं. शिवकुमार शर्मा आणि पं. हरिप्रसाद चौरसिया, पं. राजन-साजन, पं. विजय घाटे यांनी मला मोलाचे सहकार्य, प्रोत्साहन दिले. त्यामुळे साहजिकच, मला हुरूप आला आणि आखणीला सुरुवात झाली.

शास्त्रीय संगीत या संकल्पनेला र्सवकष पेश करेल असा चेहरा देणारे नाव हवे होते. इिन्सक हे नाव नक्की करते वेळी त्यातील संगीतातील सर्व कला, भाव, प्रकार, प्रवाहांना एकाठायी आणणारा अर्थ प्रतीत होत होतो.

चोवीस तास प्रसारित होणारी कोणतीही दूरचित्रवाहिनी दाखल करायची म्हणजे त्यासाठी आíथक पाया हा भक्कम लागणार! इिन्सक चॅनेलकरिता आíथक तजवीज कशी केलीत? कोणाचे सा लाभले?
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत म्हणजे केवळ गायन नव्हे. हिंदुस्थानी संस्कृतीचा, संपन्नतेचा, वैभवाचा विशुद्ध गंध घेऊन येणाऱ्या नृत्य, वादन याही कलांचा त्यात समावेश होतो. आपल्या देशातील या संपन्नतेला तितक्याच डौलदारपणे, आकर्षकरीत्या प्रसारित करणे, ही आज काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला या संदर्भात नेमके काय करायचे आहे, त्याची रूपरेषा निश्चित करून मी एक प्रोजेक्ट तयार करून दोन वर्ष फायनान्सर्सकडे अक्षरश: खेटे घातले. परंतु सर्वाचे म्हणणे हेच होते, की हा अगदी नवा विषय कोण ऐकणार, प्रेक्षक त्याला कसे स्वीकारतील, त्यातून उत्पन्न ही तर नंतरचीच बाब, पण गुंतवलेले भांडवल तरी सुटेल का, असे एक ना विविध प्रश्न चच्रेतून समोर येत जायचे आणि अखेरीस त्यांच्याकडून पसा पुरवायला नकार घेऊन मी बाहेर पडायचो. शेवटी निरुपाय झाला आणि मी माझे घर वगरे गहाण ठेवून पसा उभा केला. या चॅनेलबद्दलची माझी कळकळ जाणून माझ्यावर विश्वास असणाऱ्या मित्रांनीही मदतीचा हात दिला आणि त्यातून ‘इिन्सक..म्युझिक टू एक्सपिरिअन्स’ आकाराला आले.

सध्या देशभरात संगीत विषयाला वाहिलेल्या ९ दूरचित्रवाहिन्या आहेत. इिन्सक चॅनेल सुरू करण्याचा हेतू काय आहे आणि या चॅनेलचे वेगळेपण काय असेल?
आपल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा वैभवशाली इतिहास पाहाता तो खजिना रसिकांपर्यंत पोहोचावा, हा अगदी प्राथमिक हेतू झाला. त्याहीपुढे जात असे म्हणेन, की पूर्वीसारखा रसिकवर्ग या संगीताला लाभत नसल्याची जी ओरड होते आहे, ती या चॅनेलच्या येण्याने नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचे कारण असे की, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम मग ते गायन, वादन, नृत्य यांपकी कोणतेही असोत, ते घराजवळ क्वचित असतात आणि असलेच तर ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात असतातच असे नाही. ‘इिन्सक..म्युझिक टू एक्सपिरिअन्स’ या चॅनेलच्या माध्यमातून याप्रकारचे कार्यक्रम, दिग्गजांना ऐकण्याची संधी घरबसल्या आपल्या प्रेक्षकांना लाभणार आहे. पण हेदेखील मला सांगायला हवे, की लाइव्ह कॉन्सर्टची मजाही तितकीच अवर्णनीय आहे, कितीही झाले तरी त्याला तोड नाही. आज जीवनाची गती विलक्षण वाढलेली असताना अशा प्रकारची संगीत मेजवानी मिळणार असेल, तर तो सोने पे सुहागा असणार हे खात्रीशीर सांगतो. शिवाय, आजचा आणि भावी युवावर्ग हा समृद्ध संगीत परंपरेशी जोडला जावा, त्यांना या संगीताची गोडी लागावी, यासाठी चॅनेलने कार्यक्रमांची रचनाच त्या दृष्टीने केलेली आहे. ही रचना करण्यापूर्वी आम्ही युवावर्गामध्ये याबद्दलची चाचपणी केली होती. या म्युझिक चॅनेलकडे रसिकांना वळावेसे वाटेल, असे अनेकविध कार्यक्रम आम्ही आखलेले आहेत. ओरिजनल गझल गायकी, रागांवर आधारित चित्रपटसंगीत, भक्तीसंगीत, रागा क्लासिकल, फ्युजनचे कार्यक्रम, संगीतविषयक कार्यक्रमांचे थेट प्रसारण, स्टुडिओ रेकॉर्डेड कार्यक्रम, क्लासिकल ट्रेकिंग कार्यक्रमांतर्गत ट्रेक करता करता तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताविषयी माहितीचे आदानप्रदान, वादन असा वेगळा विचारही ठेवला आहे. रिअलिटी शो वगरेंचीही आखणी करताना अन्य वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या रिअलिटीपेक्षा रागदारी संगीतामधील रिअलिटी नेमकी कशी असते, यावर बारकाईने लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. शास्त्रीय संगीत समजायला अवघड, कंटाळवाणं नसून ते कमीत कमी वेळातही उत्तम समाधान, आनंद देऊन जाते, त्याचबरोबरीने त्याबद्दलच्या रोचक घटना, प्रसंगादींद्वारे याकडे तरुण आकृष्ट होतील, असा आम्हांला विश्वास वाटतो आहे.

‘संगीत हा प्रत्येक संवेदनशील मनाचा हळवा कोपरा आहे, त्यामुळेच इिन्सक हे त्याअनुषंगाने इमोशनल चॅनेल आहे. आम्ही याच धर्तीवर ‘इिन्सक म्युझिक कम्युनिटी’ स्थापन करणार आहोत.’

शास्त्रीय संगीतावर आधारित या वाहिनीचे नाव इिन्सक ठेवण्यामागे काही विशिष्ट हेतू आहे का? आणि या वाहिनीवरील विविध कार्यक्रमांची आखणी करणाऱ्या विशेषतज्ज्ञ समितीमध्ये कोण कोण आहेत?
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची पूर्वीची लोकप्रियता तिला पुन्हा प्राप्त करून द्यायची, हे एकदा निश्चित ठरल्यानंतर संगीताशीसंबंधित अनेक नावे समोर आली. मात्र, आम्हांला शास्त्रीय संगीत या संकल्पनेला र्सवकष पेश करेल असा चेहरा देणारे नाव हवे होते. इिन्सक हे नाव नक्की करते वेळी त्यातील संगीतातील सर्व कला, भाव, प्रकार, प्रवाहांना एकाठायी आणणारा अर्थ प्रतीत होत होता. ‘इिन्सक…म्युझिक टू एक्सपिरिअन्स’ या वाहिनीवर शास्त्रीय संगीतविषयक कार्यक्रम निवडण्यासाठी पं. हरिप्रसाद चौरसिया (बासरी), पं. शिवकुमार शर्मा (संतुर), पं. राजन – साजन मिश्रा, राशिद खान, पं. विजय घाटे (तबला) तसेच गायक शंकर महादेवन, निलाद्री कुमार (सतार) ही मातब्बर मंडळी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्याशिवाय उस्ताद झाकीर हुसन, हरिहरन, साधना सरगम यांसारखे कलाकारही सोबत आहेतच. सांगताना विशेष आनंद होतो, की दिग्गजांपासून ते अगदी नवोदितांपर्यंत साऱ्यांनीच आपापले सहकार्य इथे देऊ केले आहे.
इथे मला विशेष नमूद करावेसे वाटते, ते म्हणजे माझा भाऊ महेश तागडे ( दूरचित्रवाहिन्यांवरील प्रसिद्ध मालिका कुलवधू, लेक लाडकी या घरची, मला सासू हवी आदी) हा दूरचित्रवाहिनीवर निर्माता दिग्दर्शक असल्याने त्याची मोलाची मदत मला प्रोग्रॅमिंग, प्रोडक्शन तसेच क्रिएटिव्ह शूटिंग अशा सर्व तरहेने होत असते. महेश हा स्वत: उत्तम निर्देशक आणि संगीत जाणकार असल्याने सूर, ताल यांची नेमकी लय पकडून आपल्याला हवा तो इफेक्ट
फ्रेममधून कसा साकारायचा हे त्याच्यामुळे सहज साध्य होते. म्हणूनच इिन्सक वाहिनी आम्हां दोघांचेही स्वप्न आता साकारते आहे.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला वाहिलेल्या या पहिल्यावहिल्या वाहिनीच्या २४ X ७ प्रसारणासाठी तुम्ही काय आणि कशी तयारी केली आहेत?
शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, मफली अनेक ठिकाणी होत असल्या तरीही त्यांचे बहुतकरून व्हॉइस रेकॉìडग्ज उपलब्ध असते. त्यामुळे आम्ही काही कार्यक्रम खास चॅनेलसाठी आणि काही थेट कार्यक्रमांचे रेकॉìडग करत ३०० तासांची जुळवाजुळव केली आहे आणि ती दिवसागणिक वाढतेही आहे. सध्या देशातील प्रमुख डिजीटल केबल ऑपरेटर्सवर या वाहिनीच्या सिग्नलची चाचपणी सुरू आहे. साधारणपणे २० मिनिटांचा एक कार्यक्रम याप्रमाणे काही अंश आम्ही प्रसारित करीत आहोत आणि त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आहेत तसेच आजच्या पिढीला आवडणारे फ्युजन, फोक, सुफी, गझलचेही कार्यक्रम असतील. येत्या १५ ऑगस्टपासून इिन्सक या दूरचित्रवाहिनीचे थेट प्रसारण देशभरातील महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान इथून होत हळूहळू हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा चाहता वर्ग मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या अमेरिका, आखाती देशांमधूनही केले जाईल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताइतकेच कर्नाटकी संगीतही संपन्न आहे आणि त्याकरिता दक्षिण भारतासाठी स्वतंत्र संगीत वाहिनी तसेच एफएम रेडिओही सुरू करण्याचा आगामी मनोदय आहे. इिन्सग वाहिनीच्या चाचपणी प्रक्षेपणादरम्यानच रसिकांचे चांगले अभिप्राय, प्रतिसाद आमच्यापर्यंत पोहोचत असल्याने आमची उमेद निश्चितच वाढलेली आहे. आज स्थिती अशी आहे, की काही फायनान्सर्स आमच्याकडे गुंतवणुकीस उत्सुक असल्याचे चित्र आहे.

साधारणपणे वाहिन्या या जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपला डोलारा सावरत असतात. तर संपूर्णत शास्त्रीय संगीतावर आधारित ही दूरचित्रवाहिनी असल्याने या वाहिनीच्या रेव्हेन्यूची गणिते कशाप्रकारे मांडली आहेत?
इिन्सक ही दूरचित्रवाहिनी प्रक्षेपण प्रारंभापासून सुरुवातीचे पहिले सहा महिने मोफत दाखवली जाणार आहे. मात्र नंतर ते पेड चॅनेल असेल. लवकरच हे चॅनेल डिटीएचवरूनही प्रक्षेपित होणार असल्याने इथे संगीताशी संबंधित जाहिरातींचा समावेश होऊ शकतो. मात्र िहदी चित्रपटांच्या प्रमोशन्सकरिता आजकाल जसा सर्रास वापर वाहिन्यांतील कार्यक्रमांचा, शोज्चा केला जातो, तसे इथे होणार नाही. संगीत, संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत यांच्याशी संबंधित विषय असेल तर अशा विषयांवरील चित्रपटांचे, त्यातील कलाकारांचे इथे स्वागतच असेल.

इिन्सक या शास्त्रीय संगीताच्या पहिल्या दूरचित्रवाहिनीच्या प्रमोशनकरिता काही खास उपक्रम राबविणार आहात का..? कोणते? कसे? आणि या वाहिनीकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत?
इिन्सक या पहिल्यावहिल्या शास्त्रीय संगीतविषयक दूरचित्रवाहिनीच्या प्रमोशनकरिता आम्ही देशभर कमीत कमी ५० इव्हेंटसची आखणी केलेली आहे. देशातील मोठय़ा शहरांतून दोन दिवसीय कॉन्सर्टचे आयोजन करणार असून त्याअंतर्गत संगीतविषयक कार्यशाळा, परिसंवाद असा पहिल्या दिवशीचा कार्यक्रम असेल. तर दुसऱ्या दिवशी फक्त निखळ संगीत कॉन्सर्टचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. नुकताच आम्ही पुण्यामध्ये ‘एक्स्प्रेशन’ या संकल्पनेअंतर्गत राशिद खान यांच्या मफलीचा कार्यक्रम केला. त्यामध्ये ३ तास संपूर्ण त्यांचे ऑडिओ व्हिडीओ रेकॉìडग केले. संगीत हा प्रत्येक संवेदनशील मनाचा हळवा कोपरा आहे, त्यामुळेच इिन्सक हे त्याअनुषंगाने इमोशनल चॅनेल आहे. आम्ही याच धर्तीवर ‘इिन्सक म्युझिक कम्युनिटी’ स्थापन करणार आहोत. या माध्यमातून शास्त्रीय संगीताचा रसिक वर्ग वाढावा, तरुणांचा त्यात अधिकाधिक समावेश व्हावा, संगीताच्या सर्वप्रकारांना इथे स्थान मिळत ही समृद्ध परंपरा प्रवाहित राहावी, हाच निखळ हेतू आहे. आजच्या पिढीचा ओढा हा पाश्चात्त्य संगीतप्रकारांकडे असला तरीही आपल्या मातीचे गाणे त्यांना कालबाह्य़ वाटू नये म्हणून आपणच नव्या विचाराने याकडे पहायला हवे आहे. याकरिताच तरुणांचा अधिकाधिक सहभाग घेत, त्यांच्या आवडींचा विचार करीत साकारलेले आकर्षक वाटेल असे हे चॅनेल त्यांना नक्कीच गोडी लावेल, हा विश्वास आमच्या मनात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2013 7:37 am

Web Title: insync indias first 24 hour classical based music channel
Next Stories
1 एस. एन. त्रिपाठी तेजस्वी काजवा
2 चोखंदळपणा पथ्यावर पडला…
3 हृतिक म्हणतो, सुनैनाच माझी खरी ‘सुपरहिरो’
Just Now!
X